Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रत्येक पत्राचा पाठपुरावा

सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रत्येक पत्राचा पाठपुरावा

=पंकजा मुंडे यांचा निर्णय=
pankaja munde1मुंबई, [१६ ऑक्टोबर] – पत्र किंवा निवेदने घेऊन येणार्‍या अभ्यागतांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लागणे सुलभ व्हावे यासाठी एक वेगळे सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय ग्रामविकास, महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेल्या या सॉफ्टवेअरचे गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी सादरीकरण करण्यात आले.
पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेर तसेच त्यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी अभ्यागतांची कायम वर्दळ असते. राज्याच्या विविध भागातून येणारे नागरिक हे पंकजा मुंडे यांच्याकडील विभागांबरोबरच इतर विभागांशी संबंधितही अनेक प्रकारच्या मागण्या, पत्रं, निवेदने घेऊन येतात. या निवेदनांवर शेरा नमूद करून मंत्र्यांच्या कार्यालयाकडून ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकार्‍यांकडे पाठविली जातात. पण त्यानंतर त्या पत्र किंवा निवेदनावर काय कार्यवाही झाली, निवेदनात नमूद केलेली समस्या सुटली किंवा नाही याची माहिती संबंधित अभ्यागतास किंवा मंत्री कार्यालयास मिळत नाही. त्यामुळे या प्रक्रियेत सुलभपणा आणण्यासाठी, अभ्यागतास आपल्या मागणीसंदर्भात झालेल्या कार्यवाहीची त्या-त्या टप्प्यावर माहिती मिळण्यासाठी तसेच अभ्यागतांच्या समस्या निराकरणाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने हे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये राज्यातील सर्व प्रमुख कार्यालयांचे ई-मेल, फॅक्स क्रमांक, अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक माहितीचा समावेश असेल. एखाद्या अभ्यागताच्या पत्रावर मंत्र्यांची सही झाल्यानंतर ते पत्र या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संबंधित अधिकार्‍यास ई-मेल करण्यात येईल. हा ई-मेल कुणाला पाठविला, कधी पाठविला याची इत्यंभूत माहिती संबंधित अभ्यागतास लगेच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे आपोआप कळविली जाईल. याशिवाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या आवाजातील एक व्हॉईस मेसेजही संबंधित अभ्यागतास पाठविला जाईल. त्यामुळे अभ्यागतास आपल्या पत्राचा पाठपुरावा करणे सुलभ होईल. या प्रक्रियेमुळे पत्रव्यवहार हा सुरळीत, सुलभ, गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25162

Posted by on Oct 17 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1325 of 2451 articles)


=नितीन गडकरी यांची माहिती= कोटा, [१६ ऑक्टोबर] - केंद्र सरकार देशात सध्या वर्षाकाठी ९६ हजार किलोमीटर इतक्या रस्त्यांची बांधणी करीत ...

×