Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » सोनियांना दहशतवाद मान्य, नरेंद्र मोदी नाही

सोनियांना दहशतवाद मान्य, नरेंद्र मोदी नाही

=इशरतप्रकरणी भाजपाचा हल्ला=
SONIA GANDHI1नवी दिल्ली, [१९ एप्रिल] – इशरत जहॉंप्रकरणी भाजपाने आज मंगळवारी थेट कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढविला. कॉंगे्रस पक्ष दहशतवाद्यांना जवळ करू शकते. पण, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणे कॉंगे्रस कदापि मान्य करू शकत नाही आणि म्हणूनच सोनियांनी इशरत प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांना दुसरे शपथपत्र सादर करायला सांगितले होते, असा आरोप भाजपाने केला.
इशरत ही लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब आहे आणि तिच्यापासून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका आहे, असा स्पष्ट उल्लेख असलेल्या शपथपत्रात आपल्या सोयीनुसार बदल करण्यास सांगणार्‍या व्यक्तीचे नाव चिदम्बरम् यांनी जाहीर करावे, असे थेट आव्हान भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
शपथपत्रात बदल करण्याचे आदेश कुठून आले, हे तुम्ही सांगायलाच हवे. कारण, सत्य जाणण्यासाठी संपूर्ण देश इच्छुक आहे. कॉंगे्रस पक्षात केवळ एकाच ठिकाणाहून आदेश येत असतात, याची माहितीही देशवासीयांना आहे आणि त्या ठिकाणाचा पत्ता तुम्हालाही माहीत आहे. त्याच पत्त्यावर कॉंगे्रसचा आणि संपुआ सरकारचा रिमोट कंट्रोल आहे, असे पात्रा यांनी सांगितले.
इशरत ही तोयबाची दहशतवादी आहे आणि तिच्याकडून मोदी व भाजपाच्या अन्य नेत्यांच्या जीवाला धोका आहे, असा इशारा एनआयए आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयने दिला असतानाही सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि चिदम्बरम् यांनी ही माहिती लपवून ठेवली, असा आरोपही त्यांनी केला. माहिती लपविण्याचे कारण काय, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना तुम्ही सहन करू शकत नाही म्हणूनच ना? मोदी पंतप्रधान होऊ शकतात, हीच भीती तुमच्या मनात होती ना? तुम्ही दहशतवाद्यांना जवळ करू शकता, पण आपल्याच देशातील राजकीय नेत्यांना नाही, असा हल्लाही पात्रा यांनी चढविला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27926

Posted by on Apr 20 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (458 of 2453 articles)


=केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती= नवी दिल्ली, [१९ एप्रिल] - देशातील एक चतुर्थांश म्हणजेच ३३ कोटी लोक दुष्काळाने प्रभावित असून, एकूण ...

×