Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » सोनिया, चिदम्बरम्, मनमोहनसिंगांनी केला शपथपत्रात बदल

सोनिया, चिदम्बरम्, मनमोहनसिंगांनी केला शपथपत्रात बदल

=इशरत जहॉं प्रकरण, भूमिका स्पष्ट करण्याची भाजपाची मागणी=
Venkaiah-Naiduनवी दिल्ली, [२ मार्च] – इशरत जहॉंवरील शपथपत्रात बदल करण्यात कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांचाच प्रामुख्याने हात असल्याचा स्पष्ट आरोप भाजपाने आज बुधवारी केला. या नेत्यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही भाजपाने केली.
आपल्या राजकीय विरोधकांचा छळ करण्यासाठी आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी पूर्वीच्या संपुआ सरकारने सीबीआयचा गैरवापर केला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा आरोप भाजपाचे वरिष्ठ नेते आणि संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
या मुद्यावर संसदेत चर्चा करण्याची आणि दोषी असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. इशरत आणि तिचे साथीदार आमचेच आत्मघाती सदस्य असल्याचे लष्कर-ए-तोयबाने आपल्या वेबसाईटवर मान्य केले होते, केंद्र सरकारने गुजरात उच्च न्यायालयातही तसे शपथपत्र सादर केले होते. आयबीनेही आपला अहवाल दिला होता. असे असतानाही संपुआ सरकारमधील काही प्रभावशाली लोकांनी निव्वळ राजकीय फायद्यासाठी या शपथपत्रात बदल केला, असा आरोप नायडू यांनी केला.
माजी गृहसचिव जी. के. पिल्लई, आयबीचे माजी प्रमुख आणि आता गृह मंत्रालयातील माजी अवर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनीही या प्रकरणी इशरतबाबतचे सत्य बाहेर आणतानाच, पूर्वीच्या संपुआ सरकारचा खरा चेहराही समोर आणला, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26990

Posted by on Mar 3 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (780 of 2453 articles)


=राहुल गांधींची लोकसभेत क्लीन चिट= नवी दिल्ली, [२ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमारने देशाच्या विरोधात ...

×