Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सोनिया, राहुलने देशाची माफी मागावी!

सोनिया, राहुलने देशाची माफी मागावी!

=नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची मागणी=
chandrakumar boseनवी दिल्ली, [२४ सप्टेंबर] – पश्‍चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर आपल्या पूर्वजांनी चूक केली, हे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मान्य करावे आणि देशाची माफी मागावी, अशी मागणी नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांनी केली आहे.
भारत सरकारने चोवीस तास नेताजींच्या कुटुंबीयांची हेरगिरी केली, हे सार्वजनिक करण्यात आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून पुरते स्पष्ट होत आहे. १९५७ साली माझे वडील अमियोनाथ नेताजींशी संबंधित पुरावे घेण्यासाठी जपानला गेले असता, तिथेही भारत सरकारने आपले काही एजंट हेरगिरीसाठी लावले होते, असा गंभीर आरोप चंदकुमार बोस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला.
नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत याची पंडित जवाहरलाल नेहरू यांना कल्पना होती. आधी नेताजी जिवंत असल्याची कल्पना असलेल्या नेहरूंना नंतर ते कुठे आहेत, याचीही माहिती मिळाली होती. नेताजी कधीच समोर का आले नाही, याचे कारणही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी केलेली चूक सोनिया आणि राहुल गांधी यांनी मान्य करावी आणि देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी बोस यांनी केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24033

Posted by on Sep 25 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1415 of 2453 articles)


=पंतप्रधानांचे न्यूयॉर्कमध्ये भव्य स्वागत= न्यूयॉर्क, [२४ सप्टेंबर] - आयर्लंडचा छोटेखानी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी पाच दिवसांच्या अमेरिका ...

×