Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सोनिया, राहुल गांधींची नव्याने चौकशी होणार

सोनिया, राहुल गांधींची नव्याने चौकशी होणार

=नॅशनल हेराल्ड प्रकरण, ईडीच्या निर्णयाने खळबळ=
Sonia_Rahulनवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] – साक्षीदारांच्या अभावामुळे गुंडाळण्यात आलेली बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी नव्याने करण्याचा निर्णय अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने घेतला आहे. यामुळे कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात साक्षीदारांच्या अभावामुळे ईडीने या प्रकरणाची चौकशी गुंडाळली होती. पण, आता ती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे ईडीच्या सूत्राने सांगितले. इंग्रजी दैनिक असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’वर मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह काही वरिष्ठ कॉंगे्रस नेत्यांनी विश्‍वासघात करून दोन हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहारही केला होता, असा आरोप भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी केला आहे. त्यांच्याच तक्रारीच्या आधारे ईडीने हा खटला दाखल केला आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने गेल्या वर्षी २६ जून रोजी सोनिया आणि राहुल गांधी यांना समन्स जारी करून न्यायालयात हजर होण्याचा आदेशही दिला होता.
सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासोबतच मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोडा या नेत्यांचाही या प्रकरणात समावेश आहे. ईडीच्या या निर्णयामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
वढेरा प्रकरणात नव्याने एफआयआर
दरम्यान, सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील जमिनीच्या व्यवहारात ईडीने नव्याने एफआयआर दाखल केला आहे. यात वढेरा यांचे आरोपी म्हणून नाव नसले, तरी त्यांच्या मालकीच्या स्कायलाईट हॉस्पिलिटी या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची ईडीकडून तपासणी केली जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23899

Posted by on Sep 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1447 of 2453 articles)


=पंतप्रधानांची घोषणा, शिक्षणात गरिबीशी लढण्याची क्षमता= वाराणसी, [१८ सप्टेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा कायापालट ...

×