Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » सोमनाथ भारती पोलिसांना शरण

सोमनाथ भारती पोलिसांना शरण

=महिलांचा सन्मान करा: पोलिस आयुक्तांच्या कानपिचक्या=
somnath bharatiनवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] – पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ आणि हत्येचा प्रयत्न करणे, अशा गंभीर गुन्ह्यांत अडकलेले आम आदमी पार्टीचे आमदार आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयाने दोन दिवस स्थगिती दिल्यानंतर ते मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास दिल्ली पोलिसांना शरण गेले. यावेळी पोलिस आणि व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा महिलांचा सन्मान करा, अशा कानपिचक्या पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी त्यांना दिल्या.
सत्र न्यायालयाने भारती यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला, त्या दिवसापासूनच ते फरार झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी आगर्‍यातही धाड घातली होती. पण, त्यापूर्वीच ते तिथूनही फरार झाले. पोलिसांची शोधमोहीम सुरू असतानाच, भारती यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांची अटक १७ सप्टेंबरपर्यंत रोखणारा आदेश प्राप्त केला. या आदेशाची ढाल बनवून भारती मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांपुढे हजर झाले. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्याच कारभारावर ठपका ठेवला. त्यांना कडक शब्दात सुनावताना, आज बुधवारी पोलिस आयुक्तांनी, आधी महिलांचा सन्मान कसा करायचा हे शिका, नंतर पोलिस आणि व्यवस्थेवर बोट ठेवा, असे बजावले.
दरम्यान, पोलिसांचे धाडसत्र सुरू असताना आम आदमी पार्टीतील वरिष्ठ नेत्यांमध्येही रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. पत्नी लिपिकाने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यापेक्षा भारती यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असा सल्ला बैठकीत उपस्थित नेत्यांनी त्यांना दिला. उद्या गुरुवारी उच्च न्यायालयाचे सुरक्षा कवच कालबाह्य होणार आहे. यानंतर पोलिसांनी भारती यांना अटक केल्यास, अवघ्या चार महिन्यात तुरुंगात जाणारे भारती हे आपचे चौथे आमदार ठरणार आहेत. यापूर्वी, जितेंद्रसिंह तोमर, मनोज कुमार आणि सुरिंदर सिंग यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23822

Posted by on Sep 17 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1467 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम इतका लोक प्रिय आहे की याचा ...

×