Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » सोमनाथ भारती फरार, मोबाईलही बंद

सोमनाथ भारती फरार, मोबाईलही बंद

=हायकोर्टाचाही दणका, आता सुप्रीम कोर्टात जाणार=
somnath bharatiनवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] – सत्र न्यायालयापाठोपाठच आज मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयानेही पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ प्रकरणात एफआयआर दाखल असलेले आम आदमी पार्टीचे आमदार आणि माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. यामुळे त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता बळावली आहे.
पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यासोबतच, तिच्या हत्येचा प्रयत्न करण्याच्या गंभीर आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी सोमनाथ भारती यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अटक होण्याच्या भीतीने भारती यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्या. सुरेश कैत यांच्या खंडपीठाने फेटाळून लावला.यानंतर पोलिसांनी लगेच त्यांच्या घरावर धाड टाकली. पण, ते घरात कुठेही नव्हते. त्यांनी आपला मोबाईल फोनही बंद करून ठेवला आहे. यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. मात्र, ते कुठेही सापडले नाहीत. उत्तरप्रदेशातही पोलिसांनी काही पथके रवाना केली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सोमनाथ भारती यांचे वकील विजय अग्रवाल म्हणाले की, आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. भारती यांना अटक होण्याची शक्यता जास्त असली, तरी कायद्यात त्यांचा बचाव करण्यासाठीही काही उपाय आहेत. आम्ही त्याची चाचपणी करणार आहोत.
दोन दिवसांचा दिलासा मिळाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस ठाण्यात जाण्याच्या भारती यांच्या कृतीवरही न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. तुम्हाला पोलिस ठाण्यात जायची इतकीच आवड आहे, तर मीच तुमची येथूनच रवानगी करतो. तुम्हाला आम्ही दोन दिवसांची मोकळीक दिल्यानंतर तुम्ही तर स्वत:ला सिंह समजू लागले होते, अशा शब्दात न्यायालयाने त्यांना खडसावले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24008

Posted by on Sep 23 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1423 of 2452 articles)


जागतिक आव्हानांमुळे दोन्ही देश अतिशय जवळ आले उपराष्ट्राध्यक्ष बिदेन यांचे प्रतिपादन वॉशिंग्टन, [२२ सप्टेंबर] - भारत आणि अमेरिका एकमेकांचे ...

×