Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » सोमवारपासून संसद अधिवेशनाचा दुसरा टप्पा

सोमवारपासून संसद अधिवेशनाचा दुसरा टप्पा

=दुष्काळावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती=
sansad bhavanनवी दिल्ली, [२२ एप्रिल] – संस्थगित असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात देशाच्या विविध राज्यांमधील दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरण्याची रणनीती विरोधकांनी तयार केली आहे. दुष्काळावर चर्चा करण्यासाठी काही सदस्यांनी नोटिसाही दिल्या आहेत.
देशातील बहुतांश राज्ये भीषण दुष्काळाचा सामना करीत असताना केंद्र सरकारने मात्र डोळे बंद केले आहेत, असा आरोप करीत दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर चर्चा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा, हुसेन दलवाई, भुवनेश्‍वर कलिता, रणजीत पाटील, व्ही. ठाकूर, मोहम्मद अली खान, बिजदचे ए. यू. सिंग देव, जदयुचे के. सी. त्यागी, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा, अपक्ष राजीव चंद्रशेखर आणि मनोनित सदस्य के. टी. एस. तुलसी यांनी या मुद्यावर आधीच राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांना नोटीस दिली असून, ती स्वीकारण्यातही आली आहे.
देशातील दुष्काळ व पाण्याच्या टंचाईची स्थिती, उन्हाच्या वाढत्या झळा आणि सरकारने यावर आतापर्यंत केलेले उपाय या सर्वच मुद्यांवर विरोधकांना सखोल चर्चा करायची आहे. कामकाजाच्या नियम १७७ अंतर्गत या नोटिसा देण्यात आल्या असून, त्यावर २७ एप्रिल रोजी चर्चा करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27946

Posted by on Apr 23 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (451 of 2453 articles)


मंबई, [२२ एप्रिल] - राज्यातील विविध धरणातील साचलेला गाळ काढण्यासाठी राज्यात जिल्हा नियोजन समिती आणि यांत्रिकी विभागामार्फत एकूण ८४ कोटी ...

×