Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सोशल मीडियाच्या वापराबद्दल भाजपा खासदार उदासीन

सोशल मीडियाच्या वापराबद्दल भाजपा खासदार उदासीन

=पंतप्रधान कार्यालयाने घेतली नोंद=
bjp-flagनवी दिल्ली, [२६ मार्च] – सोशल मीडियाच्या वार्‍यालाही उभे न राहणार्‍या भाजपा खासदारांची पंतप्रधान कार्यालयाने चांगलीच कानउघाडणी केली असून आपले ‘फॉलोअर्स’ आणि ‘लाईक्स’ वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत तर भाजपाने उमेदवारी देण्यासाठी किमान २५ हजार फॉलोअर्सची अट घातली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने भाजपाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने भाजपाच्या २८१ खासदारांच्या सोशल मीडियावरील योगदानाबद्दल एक अहवाल तयार केला. भाजपा खासदाराचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत, त्याला किती लाईक्स मिळतात, तो किती पोस्ट टाकतो, सरकारची कामगिरी दर्शवणार्‍या तो किती ट्विट, रिट्विट करतो, शेअर करतो, याचा अभ्यास यात करण्यात आला. या अहवालात ८० टक्क्यांपेक्षा जास्त भाजपा खासदार अनुत्तीर्ण झाले आहेत. सोशल मीडियावरील भाजपा खासदारांच्या उदासीनतेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे २३ पैकी फक्त पाच खासदार या परीक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित १८ खासदार या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. कपिल पाटील, चिंतामण वनगा, हरिश्‍चंद्र चव्हाण, रक्षा खडसे, दिलीप गांधी, नाना पटोले, शरद बन्सोड आणि संजयकाका पाटील या आठ खासदारांचा तर सोशल मीडियाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. या खासदारांचा ट्विटरवर स्वत:चा अकाऊंट नाही आणि फेसबुकवर स्वत:चे पेजही नाही.
सोशल मीडियावर आपला प्रभाव निर्माण करणार्‍या महाराष्ट्रातील ५ खासदारांमध्ये केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, प्रदेश भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवे, पूनम महाजन, किरीट सोमय्या, आणि अनिल शिरोळे यांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना ट्विटरवर ७ लाख ८७ हजार फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर ४ लाख १२ हजार लाईक्स मिळाल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर पूनम महाजन आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तसेच ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांचा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह खासदारांमध्ये समावेश आहे. मात्र, अन्य राज्यातून राज्यसभेवर निर्वाचित झाले असल्यामुळे त्यांच्या नावांचा या अहवालात समावेश नाही.
अधिवेशनकाळात झालेल्या भाजपा सांसदीय पार्टीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर सक्रिय होण्याचे आवाहन भाजपा खासदारांना केले होते. सोशल मीडियावर सक्रिय नसल्यामुळेच केंद्र सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजपा खासदार कमी पडतात, अशी टिपण्णी पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्यामुळेच त्यांनी सोशल मीडियावरील आपला सहभाग वाढवण्याची सूचना खासदारांना केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27584

Posted by on Mar 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (569 of 2453 articles)


=दिल्ली प्रदेश भाजपाची बैठक= नवी दिल्ली, [२६ मार्च] - भाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष आहे, जेव्हा देश तोडण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा ...

×