Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » सौदी अरेबियात घडला इतिहास

सौदी अरेबियात घडला इतिहास

=सौदी अरेबियात महिलांना मिळाला प्रथमच मतदान अधिकार=
saudi arebia-MAPरियाध, [२१ ऑगस्ट] – सौदी अरेबियातील महिलांना स्थानिक निवडणुकांमध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल म्हणून याकडे बघितले जात आहे.
एवढेच नव्हे तर नव्या कायद्यानुसार सौदी अरेबियाच्या महिलांना स्थानिक निवडणुकाही लढविता येणार आहेत. या निर्णयानंतर मेदिना आणि मक्का येथे मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रारंभी महिलांचा थंड प्रतिसाद मिळाला असला तरी लवकरच याला गती मिळेल, असा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही शहरांमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे.
सौदी अरेबियाच्या राजपत्रानुसार जमला अल्-सादी आणि सैफिनाझ अबु अल-शामत या दोन महिलांनी मतदार म्हणून प्रथम नोंदणी केली आणि त्यांना मतदार ओळखपत्रही प्रदान करण्यात आले. २०११ मध्ये सौदीचे तत्कालीन राजे अब्दुल्ला बिन अब्दुल्ला अझीज अल सौद यांनी देशातील महिलांना मतदान आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रदान करण्याचा निर्णय घेतला होता. वाहन चालविणे, पगारी काम करणे, उच्च शिक्षण घेणे आणि पुरुष पालकाच्या परवानगीशिवाय विवाह करण्याची परवानगी नसलेल्या या देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळणे हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23648

Posted by on Aug 22 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1522 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२१ ऑगस्ट] - देशातील सर्वच बँका १ सप्टेंबरपासून महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बंद राहणार आहे. भारतीय बँक ...

×