Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » सौदी राजघराण्याची अल कायदाला मदत?

सौदी राजघराण्याची अल कायदाला मदत?

=९/११ चा हल्ला=
9-11 saudi arebia supportन्यूयॉर्क, [५ फेब्रुवारी] – ९/११ रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यासाठी सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील सदस्यांसह काही अधिकार्‍यांनी अल कायदाला पैसा उभा करण्यासाठी मदत केली, असा खळबळजनक दावा या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक झकारियस मौसाओई याने केला आहे.
फ्रान्सचा नागरिक असलेला झकारियस हा अल कायदाचा २० वा अपहरणकर्ता असल्याचे सांगण्यात येते. ९/११ च्या हल्ल्यातील पीडितांच्या वकिलांनी गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या उलटतपासणीत झकारियसने हा दावा केल्याचे समजते. हल्ल्यातील पीडितांनी सौदी अरेबियाविरोधातही खटला दाखल केला आहे. हा खटला मागे घेण्यात यावा, यासाठी सौदी अरेबिया प्रयत्नशील आहे. मात्र, सौदी एजंट्‌सनी प्रत्यक्ष आणि जाणीवपूर्वक अपहरणकर्त्यांना मदत केल्याचे नवे पुरावे प्राप्त झाल्याचा दावा पीडितांच्या वकिलांनी केला आहे. सौदी उच्चायुक्ताने झकारियसचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे.
आपण अल कायदाला देणगी देणार्‍यांचा एक डेटाबेस तयार केला होता. यामध्ये राजघराण्याच्याही काही सदस्यांचा समावेश होता. उदा. गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख प्रिन्स तुर्की अल फैजल आणि २००५ पर्यंत तब्बल २२२ वर्षे सौदी अरेबियाचे अमेरिकेतील राजदूत राहिलेले प्रिन्स बंदार बिन सुल्तान यांच्याही नावाचा समावेश होता, असा दावा झकारियसने आपल्या उलटतपासणीत केला आहे. १९९० च्या दशकाच्या अखेरीस यांनी अल कायदाला लाखो डॉलर्सचा निधी दिला, असाही दावा त्याने केला आहे. एवढेच नव्हे तर एअरफोर्स वनवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यासाठी सुयोग्य ठिकाण शोधण्यासाठी आपण सौदी अरेबियाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यासोबत अमेरिकेला गेलो होतो, असाही दावा त्याने केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20322

Posted by on Feb 6 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2122 of 2458 articles)


=अरुण जेटली यांचा आरोप= नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला चार दिवसच उरले असताना, आम आदमी पार्टीला ...

×