Home » उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सौर, पवनऊर्जेच्या विकासावर मोदींचा भर

सौर, पवनऊर्जेच्या विकासावर मोदींचा भर

narendra-modi4नवी दिल्ली, [१५ फेब्रुवारी] – आपल्या देशात विजेची टंचाई आहे. शिवाय विजेची निर्यात फार खर्चिक आहे. अशा स्थितीत देशातील प्रत्येक घराला परवडेल, अशा किमतीत वीज उपलब्ध करून देण्यासाठी आपण सौर आणि पवनऊर्जेचा विकास करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केले.
पहिल्या नूतनीकरण ऊर्जा जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्‌घाटन करताना मोदी बोलत होते. केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच सौर आणि पवनऊर्जा विकसित करण्याची गरज आहे. सौर ऊर्जेचे विपुल स्रोत असलेल्या ५० देशांमध्ये यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता सहकार्य प्रस्थापित होणे आवश्यक आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही देशाच्या विकासात ऊर्जेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, असे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, विकासाची गती आम्हाला वाढवायची आहे आणि त्याचवेळी ऊर्जा क्षेत्रातही विकासाची नवी उंची गाठायची आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपल्याला आलेले अनुभव त्यांनी यावेळी विशद केला. त्या काळात मी कालव्यांवर सौरऊर्जेचे प्रकल्प तयार केले होते. त्याचा फायदा केवळ विजेच्या निर्मितीकरिताच झाला असे नाही, तर पाण्याचा अपव्ययही टाळण्यात आम्हाला यश आले होते. सौरऊर्जेचा वापर सिंचनाकरिता आणि सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न वाढविण्याकरिताही होतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.
केजरीवालांवर टीका
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही पंतप्रधानांनी यावेळी अप्रत्यक्ष टीका केली. विजेची इतकी टंचाई असताना कुणी मोफत वीज देण्याची आणि त्यातही ज्यांच्याकडे वीजच नाही, असे लोक अशी घोषणा कशी करतात, असा सवाल मोदी यांनी केला. केजरीवाल यांनी शपथविधीनंतर आपल्या पहिल्याच भाषणात मोफत वीज आणि पाण्याची घोषणा केली होती

Short URL: https://vrittabharati.in/?p=20603

Posted by on Feb 16 2015. Filed under उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2060 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१५ फेब्रुवारी] - देशातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात आगामी दहा वर्षात किमान दहा लाख नोकर्‍या उपलब्ध होणार असून, ही ...

×