Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » स्पेक्ट्रमचा ‘ई-लिलाव’ही प्रारंभ

स्पेक्ट्रमचा ‘ई-लिलाव’ही प्रारंभ

=४३,१६१ कोटींचे उत्पन्न मिळणार=
Spectrum Auctionsनवी दिल्ली, [४ मार्च] – सरकारने आज बुधवारपासून दूरसंचार स्पेक्ट्रमच्या ‘ई-लिलावा’ची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘टू-जी’ स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आता कोणतीही गडबड होणार नाही, यासाठी या लिलावावर अर्थमंत्रालयाची अतिशय बारीक नजर आहे. एक लाख कोटींच्या या स्पेक्ट्रम लिलावातून सरकारच्या तिजोरीत ४३,१६१.७२ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा होणार आहे.
हा लिलाव सरकारसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, या माध्यमातून एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.१ टक्के इतकी असलेली वित्तीय तूट कमी करण्याचे सरकारचे धोरण आहे. या लिलावाची प्रक्रिया कशा प्रकारे पूर्ण करायची, याबाबतची पूर्वतयारी मंगळवारी दूरसंचार मंत्रालयाने पार पाडली. या लिलाव प्रक्रियेवर एमजंक्शन सर्व्हिसेस कंपनीने सरकारला आवश्यक ते मार्गदर्शन केले होते. सेल आणि टाटा स्टिल यांनी समान भागीदारीच्या माध्यमातून १४ वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू केली होती. ४३,१६१.७३ कोटी रुपयांच्या उत्पन्नासोबतच सरकारला दूरसंचार कंपन्यांकडून प्रवेश शुल्क आणि अन्य प्रकारचे शुल्कही प्राप्त होणार आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या (एप्रिल ते जानेवारी) काळात वित्तीय तूट ५,६८,००० कोटी इतकी होती. ही तूट एकूण अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा ११० टक्के जास्त होती. ही तूट ५,१२,६२८ कोटी रुपयांपर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी या लिलावाला सरकारने विशेष महत्त्व दिले आहे, असे सूत्राचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21115

Posted by on Mar 5 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1973 of 2453 articles)


=महानायक अमिताभ बच्चन यांची खंत= मुंबई, [४ मार्च] - एक काळ होता... घरातील सर्व सदस्य सायंकाळी एकत्र यायचे... दिवसभरातील घडामोडी, ...

×