Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » स्पेक्ट्रम लिलावास केंद्राची मंजुरी

स्पेक्ट्रम लिलावास केंद्राची मंजुरी

=सरकारी तिजोरी खणखणणार, वस्त्रोद्योगासाठी ६ हजार कोटी=
Arun Jaitley9नवी दिल्ली, [२२ जून] – केंद्र सरकारने आज एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पेक्ट्रमच्या लिलावाला परवानगी दिली. या लिलावामुळे सरकारच्या तिजोरीत ५ लाख ६६ हजार कोटींची भर पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. नॅशनल मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निर्णयाची माहिती दिली. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासातील स्पेक्ट्रमचा हा सर्वात मोठा लिलाव असल्याचे जेटली यांनी सांगितले.
प्रिमियम म्हणून ओळखल्या जाणार्‍या ७०० एमएचझेड बँड स्पेक्ट्रमच्या लिलावाला प्रथमच मंजुरी देण्यात आली. यामुळे मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्याचा खर्च ७० टक्क्याने कमी होणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. या लिलावाचे दर आणि अन्य तपशील ठरवण्याचा अधिकार ट्रायला देण्यात आला आहे. ट्रायच्या अहवालानंतर लवकरच या स्पेक्ट्रमचा लिलाव अतिशय पारदर्शी पद्धतीने होईल, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
स्पेक्ट्रम लिलावाची कागदोपत्री प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होईल. ६ जुलैला लिलावपूर्व बैठक होईल. लिलावाची प्रत्यक्ष प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज आहे. या लिलावातून दूरसंचार खात्याला ५ लाख ६६ हजार कोटींचा महसूल प्राप्त होण्याचा अंदाज आहे. हा मसहूल खात्याच्या २०१४-१५च्या २ लाख ५४ हजार कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नापेक्षा दुपटीने जास्त राहणार आहे. २३०० मेगाहर्टस्‌च्या स्पेक्ट्रमच्या लिलावातून ६४ हजार कोटी मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय दळणवळण क्षेत्रातील विविध शुल्क आणि सेवांच्या माध्यमातून ९८,९९५ कोटी रुपये मिळणार आहेत.
वस्त्रोद्योगासाठी ६ हजार कोटी
वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ६ हजार कोटींच्या विशेष पॅकेजलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे रोजगाराच्या १ कोटी संधी उपलब्ध होतील. त्यातील ७० टक्के महिलांना मिळतील, असे जेटली म्हणाले. येत्या तीन वर्षात वस्त्रोद्योग क्षेत्रात १ कोटी रोजगार निर्माण होणार असून, यासाठी सरकारने ६ हजार कोटींची तरतूद केली आहे, असे वस्त्रोद्योग खात्याच्या सचिव रश्मी वर्मा यांनी सांगितले. या पॅकेजबाबतचे सादरीकरणही त्यांनी यावेळी केले.
बिहारची राजधानी पाटण्यातील गंगा नदीवरील गांधीसेतूच्या पुनर्निर्माणालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ५.५ किमी लांबीच्या या सेतूवर १,७४२ कोटी रुपये खर्च करून चारपदरी रस्ता बांधला जाणार आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील प्रस्ताव १५ वर्षांपासून प्रलंबित होता.
केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर भाजपानेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे, याकडे लक्ष वेधले असता जेटली म्हणाले की, त्यांच्यावर सरकारचा पूर्ण विश्‍वास आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरही हल्ला चढवला होता, असे विचारले असता जेटली म्हणाले की, डॉ. स्वामी यांच्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28739

Posted by on Jun 23 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (191 of 2453 articles)


=मौर्य यांचा बसपाला रामराम= लखनौ, [२२ जून] - विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या उत्तरप्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बसपाला आज बुधवारी ...

×