Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘स्मार्ट’ शहरांकरिता कृती दल स्थापन

‘स्मार्ट’ शहरांकरिता कृती दल स्थापन

=विविध मंत्रालयातील प्रतिनिधींचा समावेश=
Venkaiah-Naidu2नवी दिल्ली, [४ मार्च] – पहिल्या टप्प्यात अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम् या शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याकरिता केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज बुधवारी कृती दलाची स्थापना केली.
या कृती दलात नगरविकास आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासोबतच संबंधित राज्य सरकार, संबंधित शहरे आणि अमेरिकन ट्रेड डेव्हलपमेंट एजन्सीच्या प्रतिनिधींचा समावेश राहणार आहे, अशी माहिती नगर विकास मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. व्यंकय्या नायडू आणि अमेरिकेचे वाणिज्य मंत्री पेनी प्रित्झकर यांच्या अलीकडेच झालेल्या चर्चेत कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अमेरिकन एजन्सी आणि राजस्थान, उत्तरप्रदेश व केरळ या राज्यांमधील सरकारच्या प्रतिनिधींनी अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम् या शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षीच्या आपल्या अमेरिका भेटीच्या काळात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत धोरणात्मक आणि व्यावसायिक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली होती. तेव्हा, उपरोक्त तिन्ही शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी अमेरिकेने दर्शविली होती. त्याच अनुषंगाने हे कृती दल स्थापन करण्यात आले असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21106

Posted by on Mar 5 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1977 of 2453 articles)


पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात विरोधकांना धरले धारेवर वाजपेयींच्या योजनांची कॉंग्रेसने नावे बदलली नवी दिल्ली, [३ मार्च] - भाजपावर तुम्ही ...

×