Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » स्मार्ट शहरांसाठी १० सल्लागार कंपन्यांची नेमणूक

स्मार्ट शहरांसाठी १० सल्लागार कंपन्यांची नेमणूक

smart-cityनवी दिल्ली, [७ ऑक्टोबर] – केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील १० शहरांचे आराखडे तयार करण्यासाठी सल्लागार कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित दोन दिवसांच्या स्मार्ट सिटी शिबिराचा (आयडियाज कॅम्प) आज बुधवारी समारोप झाला. स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झालेल्या देशातील ९८ शहरांच्या प्रशासनातील अधिकारी व सल्लागारांनी यामध्ये सहभाग घेतला. नगरविकास विभागाच्या (विशेष प्रकल्प) सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांनी या शिबिरात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
९८ पैकी ८८ शहरांसाठी नेमलेल्या सल्लागारांची नावे जाहीर केली. यानुसार महाराष्ट्रातील १० स्मार्ट सिटींचे आराखडे तयार करण्यासाठी दहा सल्लागार नेमण्यात आले आहेत. नागपूर, अमरावती, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, सोलापूर, या शहरांसाठी क्रिसिल कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. बृहन्मुंबईसाठी अलिया कन्सल्टिंग सोल्युशन्स प्रा. लि. व जेनेसिस फिन., पुणे शहरासाठी मॅक्किन्सी कन्सलन्टंट्स, नवी मुंबईसाठी टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि., स्पॅटियल डिसिजन्स व महा इन्फोटेक प्रा. लि. आणि औरंगाबाद शहरासाठी नाईट फ्रँक (इं) प्रा. लि, फोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व पीएसपी फिनान्शियल कन्सल्टंट्स प्रा. लि. कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.
हे सल्लागार संबंधित शहरांचा विद्यमान विकास आराखडा विचारात घेऊन स्थानिक महापालिका व राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्मार्ट सिटीचे आराखडे तयार करतील. या संकल्प योजनांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्र विकासाच्या आराखड्याखेरीज त्यासाठी लागणार्‍या निधीची सोय कशी करणार याचाही तपशीलवार विचार केला जाईल.
सल्लागारांच्या नेमणुकीमुळे या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी केंद्र सरकारने योजलेल्या स्मार्ट सिटी चॅलेंज या स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्मार्ट सिटी चॅलेंजचा दुसरा टप्पा डिसेंबर-जानेवारीत होईल. त्यावेळी स्मार्ट सिटी होण्यासाठी निवड केलेल्या देशभरातील सर्व शहरांनी सादर केलेल्या संकल्प आराखड्यांचे गुणात्मक मूल्यमापन केले जाईल व त्यातून केंद्राकडून यंदाच्या वित्तीय वर्षात प्रत्येकी १०० कोटी रुपये देण्यासाठी २० शहरांची निवड केली जाईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25029

Posted by on Oct 8 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1362 of 2453 articles)


मुंबई, [७ ऑक्टोबर] - बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन हे जंगलातून जात असताना ते समोर आणि त्यांच्या मागे वाघ धावत आहे. ...

×