स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एप्रिलमध्ये शुभारंभ
Tuesday, March 17th, 2015=व्यंकय्या नायडू यांची माहिती=
नवी दिल्ली, [१६ मार्च] – देशात स्मार्ट शहरांच्या बांधणीसाठी सुरू असलेली सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नरेंद्र मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पुढील महिन्यात शुभारंभ होणार आहे.
हा बहुप्रतिक्षित प्रकल्प आता सुरू होण्याच्या टप्प्यात आहे. प्रतीक्षा संपली असून, या प्रकल्पाशी संबंध असलेल्या विविध कंपन्यांसोबत सुरू असलेली सल्लामसलतीची प्रदीर्घ प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. याच महिन्याच्या अखेरीस आवश्यक ती मंजुरी घेतली जाईल आणि एप्रिलच्या सुरुवातीलाच हा प्रकल्प राबविण्याच्या दिशेने काम सुरू झालेले असेल, अशी माहिती नगर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीवरील एका परिसंवादाला संबोधित करताना दिली.
हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. वाढत्या शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आम्ही आता सामूहिकरीत्या सज्ज झालो आहोत, असे सांगताना स्मार्ट शहरांकरिता केंद्र सरकारने जे निकष ठरविले आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. राजकीय किंवा इतर कोणताही घटक विचारात घेतला जाणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशात शंभर स्मार्ट शहरे बांधण्याची घोषणा केली होती. यासाठी जपान आणि अमेरिकेसह विविध देशांमधील तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात येत आहे
Short URL: https://vrittabharati.in/?p=21512

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!