Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » स्मृती इराणींवर हक्कभंग आणणार

स्मृती इराणींवर हक्कभंग आणणार

=कॉंग्रेसचा इशारा=
smriti-irani_5नवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – रोहित वेमुलाच्या दुर्दैवी आत्महत्येच्या मुद्यावर केंद्रीय मनुष्यबळमंत्री स्मृती इराणी यांनी संसदेची दिशाभूल केली, असा आरोप कॉंग्रेसने केला असून, त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला.
कॉंग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक, कॉंग्रेस प्रवक्त्या कुमारी शैलजा आणि मनीष तिवारी यांनी शनिवारी एका निवेदनातून दिला हा इशारा दिला.
रोहितच्या आत्महत्येबाबत स्मृती इराणी यांनी संसदेत जे निवेदन केले ते धांदात खोटे आहे, असा आरोप करत कॉंग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले की, रोहित वेमुलाची आई राधिका यांनी स्मृती इराणी यांनी आपल्या मुलाच्या आत्महत्येबाबत केलेले दावे खोडून काढले आहेत. ज्यावेळी रोहितचा मृत्यू झाला, त्यावेळी त्याच्याजवळ कोणीच नव्हते, असा दावा स्मृती इराणी यांनी आपल्या उत्तरात केला होता. त्याचे निराकरण एका महिला डॉक्टरने केले होते.
रोहितने आत्महत्या केल्याचा कॉल येताच आपण तातडीने वसतिगृहातील त्याच्या खोलीत गेलो. तिथे पोहोचल्यानंतर १५ मिनिटांनी रोहितचा मृत्यू झाला, त्याच्या मृत्यूची घोषणा आपण केली, असे या महिला डॉक्टरने म्हटले होते. स्मृती इराणी खोटे बोलत असल्याचा आरोपही या डॉक्टरने केला होता, याकडे कॉंग्रेसने निवेदनातून लक्ष वेधले आहे.
रोहितच्या आत्महत्येबाबत जी कारणे स्मृती इराणी यांनी सांगितली, वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळीच आहे, याकडे लक्ष वेधत कॉंग्रेसने म्हटले की, आपल्या मुलाला आत्महत्येसाठी बाध्य करण्यात आल्याचा आरोप राधिका वेमुला यांनी केला होता. रोहित हा दलित असताना तो दलित नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
रोहित दलित असल्याबाबतची कागदपत्रे राधिका वेमुला यांनी पत्रपरिषदेत सादर केली होती. त्यामुळे रोहितच्या आत्महत्येच्या मुद्यावर संसदेची आणि पर्यायाने देशाची दिशाभूल केल्याबद्दल मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26921

Posted by on Feb 28 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (802 of 2453 articles)


=सचिवालयातील नियुक्ती घोटाळा= भोपाळ, [२७ फेब्रुवारी] - विधिमंडळ सचिवालयातील नियुक्त्यांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह ...

×