Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » स्मृती इराणी प्रामाणिक

स्मृती इराणी प्रामाणिक

=लालूप्रसाद यादव यांची भूमिका=
laluprasad-yadavनवी दिल्ली, [२६ जून] – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीविषयीचा वाद न्यायालयात पोहोचला असताना आणि न्यायालयानेही त्यावर सुनावणी करण्याचे मान्य केले असताना, राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी स्मृती इराणी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची असू शकते, कदाचित त्यांची पदवीही बोगस असू शकते. पण, स्मृती इराणी या प्रामाणिक आहेत, असे लालूप्रसाद यांनी स्पष्ट केले.
स्मृती इराणी यांच्या पदवीशी देशाला काहीच करायचे नाही. त्या मात्र पूर्णपणे खर्‍या आणि प्रामाणिक आहेत. त्यांची कामगिरी आणि हेतूविषयी कुणीही शंका करण्याचे कारण नाही. त्या एक महिला आहे आणि आपल्या कार्याशी नेहमीच एकनिष्ठ राहिल्या आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या टीव्ही मालिकेत त्यांनी काम केले आहे. त्या माझा खूप आदर करतात आणि मलाही त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे, असे लालूप्रसाद म्हणाले.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची शैक्षणिक माहिती दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांच्यावर आहे. याप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करण्याची तयारीही न्यायालयाने दर्शविली आहे. तथापि, सुनावणीच्या दिवशी याचिकाकर्त्याने स्मृती इराणी यांची पदवी खरोखरच बोगस आहे, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे सादर करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23098

Posted by on Jun 27 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1605 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२१ जून] - २००५ पूर्वीच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा परत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून ...

×