Home » ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » स्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी

स्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी

=एआरएआयतर्फे आयोजित सियाट-२०१५ परिषदेचा समारोप=
nitin_gadkari-3पुणे, [२३ जनेवारी] – भारताला सध्या दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांचे खनीज इंधन परदेशी चलनात विकत घ्यावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी स्वच्छ इंधनावर अधिकाधिक संशोधन करावे, त्यासाठी शेतकर्‍यांनाही बरोबर घ्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी द ऑटोमोटीव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सिम्पोजियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटीव्ह टेक्नोलॉजी २०१५ (सियाट) या स्वयंचलित वाहनांच्या तंत्रज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना केले.
विक्रम साराभाई स्पेस रीसर्च सेंटरचे संचालक एम. सी. दातन, एआरएआयच्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे, नॅशनल ऑटोमोटीव्ह टेस्टिंग ऍन्ड रीसर्च आर ऍन्ड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट (नॅट्रीप)चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गोकर्ण, रस्ते वाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय बंदोपाध्याय, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले, विद्यमान इंधनपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या इंधन आयातीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. यावर उपाय काढण्यासाठी स्वच्छ इंधन निर्मिती होणे गरजेचे आहे. सोबतच मोठ्या प्रमाणावर ते निर्यात होणेही गरजेचे असून, त्यासाठी ‘मेक इन इंडिया’ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ऑटोमोटीव्ह क्षेत्रातील तज्ज्ञांनी संशोधन करावे. त्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहे.
या स्वच्छ इंधनावर आधारित गाड्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकार लवकरच क्लीन फ्युएल व्हेईकल पॉलिसी आणणार असून, त्यासाठी इंधनामध्ये ५ टक्कक्के आणि गाड्यांच्या निर्मितीवर ५ टक्के करांमध्ये सवलत मिळावी, असा प्रस्ताव, अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगून, आज संकटात आलेला शेतकरी स्वच्छ इंधन निर्मितीसाठी उपयोगी येऊ शकतो. शेतकरी जैव इंधन निर्मिती करू शकतो. त्याचाही संशोधनामध्ये उपयोग व्हावा, असे गडकरी म्हणाले.
या इंधनाला बरोबर घेऊन, जल वाहतुकीला प्राधान्य देण्याला, केंद्र सरकारचे प्राधान्य राहणार आहे. छोट्या शहरांमध्येही जलवाहतूक करण्यासाठी हॉवरक्राफ्ट, कॅटरमरीन, सी प्लेन आणि पाण्यासह रस्त्यावर चालणारी बस यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि पर्यटनालाही चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले.
नवा भारत तयार करायचा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तत्व (एथिक्स), अर्थव्यवस्थेचा विकास (इकॉनॉमी) आणि पर्यावरण (इकॉलॉजी) अशी त्रिसूत्री समोर ठेवली आहे. त्याला अनुसरून अभियांत्रिकी, अंमलबजावणी आणि ई-एज्युकेशन असे धोरण रस्ते वाहतूक मंत्रालयाने तयार केले आहे. त्यामध्ये अधिकाधिक रस्ते सिमेंटचे करणे, प्रवाश्यांची सुरक्षितता आणि परवाना सुलभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नवा मोटार वाहन कायदा लवकरच करण्यात येणार असून, त्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना दथन म्हणाले, ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासाठी, विशिष्ट प्रकारचे उत्पादन करणे गरजेचे असून, ऑटोमोटीव्ह क्षेत्राने रिक्षासारख्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, ज्यामुळे सामान्य माणसांचा फायदा होईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19986

Posted by on Jan 24 2015. Filed under ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (2185 of 2451 articles)


पुणे, [२३ जानेवारी] - शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेचा राम कदम कला गौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ गीतकार आणि ...

×