Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात दहा लाख नोकर्‍या

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात दहा लाख नोकर्‍या

suit narendramodiनवी दिल्ली, [१५ फेब्रुवारी] – देशातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात आगामी दहा वर्षात किमान दहा लाख नोकर्‍या उपलब्ध होणार असून, ही बाब देशातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. यामुळे युवकांसाठी खरोखरच अच्छे दिन येणार आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
वातावरणातील बदलांबाबत वाढता आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेता केंद्र सरकारनेही स्वच्छ ऊर्जा क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी कंबर कसली आहे. तापमानात वाढ करणार्‍या आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवणार्‍या ऊर्जेच्या पर्यायांची चाचपणी करण्यावर सरकारचा सध्या भर आहे.
पॅरिसमध्ये याच वर्षी वातावरणातील बदलांवर महत्त्वपूर्ण परिषद होऊ घातली आहे. तापमानात वाढ करणारे आणि प्रदूषण वाढविणारे उद्योग, ऊर्जाप्रकल्प आणि अन्य क्षेत्रांनी विद्यमान अद्ययावत तंत्रज्ञानाचा पर्याय स्वीकारायलाच हवा, यावर या परिषदेत करार होण्याची शक्यता फार जास्त आहे.
भारत सरकारनेही हाच पर्याय आतापासूनच स्वीकारण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. सोबतच, आगामी सात वर्षात सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक लाख मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचेही लक्ष्य निर्धारित केले आहे. याशिवाय, पवनऊर्जा क्षेत्रातूनही आगामी दहा वर्षात एक लाख मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. पवनऊर्जेच्या माध्यमातून किमान तीन लाख मेगावॅट विजेच्या निर्मितीची भारताची क्षमता आहे. तथापि, यासाठी दोन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20599

Posted by on Feb 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2061 of 2453 articles)


=केवळ घोषणा कामाच्या नाहीत - सरसंघचालक= कानपूर, [१५ फेब्रुवारी] - आज संपूर्ण समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. ...

×