Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » स्वच्छ भारत अभियानाची दमदार सुरुवात

स्वच्छ भारत अभियानाची दमदार सुरुवात

=‘वॉटर एड’चा अहवाल, लोकांचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी जादा निधीची गरज=
swachha bharat abhiyanकोची, [२२ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात खरोखरच दमदार झाली आहे. पहिल्याच वर्षात ८० लाख शौचालये बांधण्यात आली. हे अभियान पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या विचारसरणीत व्यापक बदल करणे आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याची गरज आहे, असे मत ‘वॉटर एड’ या जागतिक संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले.
काही भागांमध्ये सुमार बांधकाम आणि नागरिकांचा जुनाच दृष्टिकोन यामुळे पहिल्या वर्षात जितक्या शौचालयांच्या बांधणीची अपेक्षा होती, ती पूर्ण होऊ शकली नसली, तरी अवघ्या एकाच वर्षात ८० लाख शौचालयांचे उद्दिष्ट गाठणे हेदेखील तितकेच उल्लेखनीय आहे. आमच्या मते, या अभियानाची सुरुवात खरोखरच दमदार झाली आहे, असे पिण्याचे स्वच्छ पाणी, पोषक हवामान, साफसफाई यासारख्या पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणार्‍या या जागतिक संस्थेने म्हटले आहे. सोबतच, या संस्थेने शौचालयांच्या बांधकामांचा दर्जा आणखी सुधारण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले.
२०१९ पर्यंत देशातील प्रत्येक घरात शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा आवर्जुन उल्लेख करून अहवालात म्हटले आहे की, ज्या देशांमध्ये अजूनही ५६० दशलक्ष लोक उघड्यावर शौच करतात, त्या देशात इतके मोठे अभियान राबविणे लहान कार्य नाही. पण, मोदी यांनी ते हाती घेतले आणि पहिल्याच वर्षात मोठे यशही मिळविले.
अभियानाची सुरुवात दमदार झाल्यामुळेच आतापर्यंत ८० लाख शौचालये बांधणे शक्य झाले आहे. या अभियानाला आणखी निधी उपलब्ध करण्याची आणि गती वाढविण्याची गरज आहे. बर्‍याच नागरिकांचा दृष्टिकोन बदलला असला, तरी मोठ्या प्रमाणात नागरिक अजूनही जुन्याच विचारांचे आहेत. मोदी सरकार या अभियानात नक्कीच यशस्वी होईल, असा आम्हाला विश्‍वास असल्याचेही अहवालात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25652

Posted by on Nov 23 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1180 of 2453 articles)


=पंतप्रधान मोदी यांची भूमिका= क्वालालाम्पूर, [२२ नोव्हेंबर] - इसिसच्या वाढत्या क्रौर्यामुळे दहशतवाद जगापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे, असे स्पष्ट करताना ...

×