Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या कॉलर ट्युन्स

‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या कॉलर ट्युन्स

=तीन पैकी कोणतीही एक निःशुल्क=
swachha bharat abhiyanनवी दिल्ली, [१० जानेवारी] – पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या महत्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानात जास्तीतजास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकार आता नवनव्या कल्पनांचा उपयोग करीत आहे. या अभियानाविषयी जनसामान्यांच्या मनात उत्सुकता आणि सहभागाची इच्छा निर्माण व्हावी यासाठी या अभियानाच्या ‘कॉलर ट्युन्स’ तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अशा तीन ट्युन्स असून, त्या निःशुल्क प्राप्त होणार आहेत.
या तीन पैकी कोणतीही एक ट्युन निवडण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना राहणार आहे. पुढील ९९९ दिवसांकरिता त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र त्यानंतरच्या ९९९ दिवसांकरिता ही ट्युन सुरू ठेवण्यासाठी संबंधित मोबाईल कंपन्या किरकोळ मासिक शुल्क आकारणार आहेत. सध्यातरी काही मर्यादित मोबाईल कंपन्यांसाठीच ही ट्युन उपलब्ध करून देण्यात आली असून, संबंधित कंपनीची सेवा वापरणार्‍या सर्व ग्राहकांना त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19531

Posted by on Jan 11 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2266 of 2453 articles)


भ्रष्ट बाबूंना दिला दणका विदर्भातील तिघांसह आठ अधिकार्‍यांची संपत्ती गोठविणार मुंबई, [९ जानेवारी] - राज्य प्रशासनातील भ्रष्ट अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई ...

×