Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » स्वच्छ भारत अभियानाला युएसएड, गेट्‌स फाऊंडेशनचा पाठिंबा

स्वच्छ भारत अभियानाला युएसएड, गेट्‌स फाऊंडेशनचा पाठिंबा

=पाच वर्षात १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत करणार=
swachha bharat abhiyanनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाला युएसएड आणि बिल-मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशनने (बीएमजीएफ) आपला पाठिंबा जाहीर केला असून, या अभियानाच्या यशासाठी पुढील पाच वर्षात १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले आहे.
नगरविकास मंत्रालयाने यासंदर्भात युएसएड आणि बीएमजीएफशी सामंजस्य करार केला असून, या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने देशाच्या शहरी भागातील स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय क्षमता वाढविण्यासाठीदेखील मदत केली जाणार आहे. राष्ट्रीय स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रचलित सवोर्र्त्तम व्यवस्था, नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान यांचेही आदानप्रदान करण्यात येणार आहे. बीएमजीएफने पुढील पाच वर्षात स्वच्छ भारत अभियानासाठी दरवर्षी अडीच दशलक्ष अमेरिकन डॉलर्स तर, युएसएडने दरवर्षी दोन दशलक्ष डॉलर्सची मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.
२ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि त्यादिवशी संपूर्ण भारत स्वच्छ करून महात्मा गांधींना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या अभियानाला लोकचळवळीत रूपांतरित करण्याच्या हेतूने समाजातील वेगवेगळ्या घटकातील नावाजलेल्या व्यक्तींना पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19685

Posted by on Jan 14 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2240 of 2453 articles)


पॅरिस, [१३ जानेवारी] - अलीकडेच भीषण दहशतवादी हल्ला झालेल्या शार्ली एब्दो या व्यंग्यचित्र साप्ताहिकाने पुन्हा एकदा उद्या बुधवारी प्रकाशित होणार्‍या ...

×