Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » स्वच्छ महाराष्ट्र कोषाची स्थापना

स्वच्छ महाराष्ट्र कोषाची स्थापना

=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय=
Mantralaya-Mumbai1मुंबई, [२४ नोव्हेंबर] – राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी ‘स्वच्छ महाराष्ट्र कोष’ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागात राबविण्यात येणार्‍या योजनांसाठी हा कोष वापरण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री या कोषाचे अध्यक्ष असतील, तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, नगरविकास राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (नगर विकास-१), प्रधान सचिव (पाणी पुरवठा व स्वच्छता), सचिव (नगर विकास-२) यांचा सदस्य म्हणून समावेश असून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक हे कोषाध्यक्ष असतील.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व शहरे आणि गावे हागणदारीमुक्त करून स्वच्छ करायची आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी वैयक्तिक शौचालये, सामुदायिक शौचालये आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी येणार्‍या खर्चाच्या प्रमाणात प्राप्त होणारे केंद्र व राज्य शासनाचे अनुदान पुरेसे नाही. तसेच सार्वजनिक शौचालयांसाठी केंद्र व राज्यशासनाचे अनुदान उपलब्ध होणार नाही. त्यामुळे या दोनही शासनाच्या निधीव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून निधी उपलब्ध करण्याची गरज भासू लागली होती.
केंद्र शासनाने त्यांच्या स्तरावर सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून येणार्‍या निधीसाठी स्वच्छ भारत कोष स्थापन केलेला आहे. नीती आयोगाने स्वच्छ भारत अभियानासाठी नेमलेल्या अभ्यास गटाने राज्यस्तरावर यासाठी स्वतंत्र कोष निर्माण करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीएसआरच्या मार्गाने निधी उभारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्यात आला आहे. या कोषाची नोंदणी संस्था नोंदणी कायदा, १८६० व मुंबई पब्लिक ट्रस्ट, १९५० नुसार करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25698

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1162 of 2451 articles)


=अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट= नवी दिल्ली, [२४ नोव्हेंबर] - आपले यकृत आता केवळ २५ टक्केच कार्यरत असून आपल्याला हेपेटायटीस बीची ...

×