Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीसाठी भारताने मदत करावी

स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीसाठी भारताने मदत करावी

=नईला कादरी यांची मागणी=
NAILA QADRIइस्लामाबाद, [३ एप्रिल] – १९७१ साली पाकिस्तानातून फुटून निघण्यासाठी बांगलादेशला जशी भारताने मदत केली तशीच मदत आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीसुद्धा करायला हवी, अशी मागणी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या कार्यकर्त्या नईला कादरी यांनी केली आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते बलूची नागरिकांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक देतात, त्यामुळे आम्ही स्वातंत्र्यासाठी भारताकडे आशेने पाहत आहोत, असेही त्या म्हणाल्या.
बांगलादेशाची निर्मिती ही पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी तेथील नागरिकांवर केलेल्या अन्याय आणि उपेक्षेची परिणती होती. बलूची नागरिकसुद्धा येथे मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत आणि इस्लामाबादला बलूची नागरिकांचे काहीही घेणे-देणे नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तथाकथित रॉच्या अधिकार्‍याला अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्या म्हणाल्या, पाकिस्तानला खोटे बोलण्याची सवय आहे. ही अटक देखील खोटेपणाचा नमुनाच असून पाकिस्तानच्या निर्मितीचा पायाच मुळात खोटेपणावर आधारित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
१९७० पासून आम्ही स्वतंत्र बलूच राष्ट्राची मागणी करीत आहोत. आमची मुख्य भाषाही बलूची आहे. आमची राजधानी क्वेटा आहे. आम्हाला बळाच्या जोरावर कोणीही पाकिस्तानमध्ये राहण्यास बाध्य करू शकत नाही. चीन आणि पाकदरम्यानच्या बलुचिस्तान प्रांतातून जाणार्‍या आर्थिक कॉरिडॉरला त्यांनी विरोध दर्शविला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27696

Posted by on Apr 4 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (535 of 2458 articles)


=घर व कार घेणार्‍यांसाठी खुशखबर!= नवी दिल्ली, [३ एप्रिल] - घाऊक व किरकोळ महागाई पूर्णपणे नियंत्रणात असल्याने केंद्र सरकारनेही आर्थिक ...

×