Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » स्वत:चे घर नाही, कुणाचेही कर्ज नाही

स्वत:चे घर नाही, कुणाचेही कर्ज नाही

=२०१० च्या प्रतिज्ञापत्रात माल्यांनी दिली होती माहिती=
Vijay Mallyaनवी दिल्ली, [१२ मार्च] – सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून आणि अंमलबजावणी संचालनालय तसेच न्यायव्यवस्थेलाही चकमा देऊन भारतातून पलायन करणारे मद्यसम्राट विजय माल्या यांनी २०१० मधील राज्यसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्जासोबतच जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र माझे स्वत:चे घर नाही आणि कोणत्याही बँकेचे माझ्यावर एका पैशाचेही कर्ज नाही, असे नमूद केले होते.
माझ्याकडे मालकीचे घर आणि जमीन नाही. पण, व्यवसायातून जमा केलेल्या ६१५ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मी मालक असून, हा पैसा आपण फेरारी कार, दागिने, विविध रोखे, बचत ठेवी आणि अन्य स्वरूपांमध्ये गुंतविला आहे. विशेष म्हणजे, २०१० मध्ये विजय माल्यांजवळ साडेनऊ हजार रुपये इतकीच रोख रक्कम होती, असेही या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते.
विविध बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय आणि न्यायव्यवस्थेने पाश आवळल्यानंतर विदेशात पळ काढणार्‍या माल्यांजवळ मुंबई, गोवा, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये आलिशान महाल असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या संपत्तीचे मालक असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. असे असतानाही त्यांनी २०१० मधील राज्यसभा निवडणुकीत अशा प्रकारचे खोटे प्रतिज्ञापत्र दिले असल्याचेही आता उघड झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27260

Posted by on Mar 13 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (681 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१२ मार्च] - महाराष्ट्रातील तीन भाषातज्ज्ञांचा शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मानव ...

×