Home » उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय » स्वस्त विजेसाठी कोळशाचा लिलाव: जेटली

स्वस्त विजेसाठी कोळशाचा लिलाव: जेटली

arun-jaitley_06नवी दिल्ली, [१७ फेब्रुवारी] – सध्या सुरू असलेल्या कोळसा खाणींच्या लिलावामुळे जनतेला स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. जेटली येत्या २८ फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
गुंतवणुकीसाठी देश विदेशातील गुंतवणूकदारांना भारतात उत्तम संधी आहे. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची विश्‍वसनीयता, लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास आणि गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी असलेली आमची क्षमता कारणीभूत आहे. त्यादृष्टीने अंतर्गत प्रणालीला गती द्यावी लागेल आणि याकरिता वीज आवश्यक असल्याचे मत ‘पुन्हा गुंतवणूक-२०१५’ या विषयावरील परिषदेत बोलताना जेटली यांनी व्यक्त केले.
अनेक राज्ये स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देतात. पण, सध्या सुरू असलेल्या कोळसा खाण लिलावामुळे सामान्य माणसाला कमी किमतीत वीज उपलब्ध होईल. नव्याने निविदा प्रक्रियेमुळे आज ज्या दरात तुम्हाला इंधन मिळत आहे, त्याच दरात वीज मिळेल. एक प्रकारे राज्यांनी स्वस्त दरात वीज पुरवठा करणे, याचा अर्थ तुम्हाला जनतेवर कर लादावे लागतील असा होतो, असे ते म्हणाले. कोळसा खाण लिलावाची पहिली प्रक्रिया २२ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20660

Posted by on Feb 18 2015. Filed under उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2049 of 2453 articles)


=पंतप्रधानांचा स्पष्ट इशारा= नवी दिल्ली, [१७ फेब्रुवारी] - राजधानी दिल्लीतील चर्चवर अलीकडील काळात झालेल्या हल्ल्यांप्रकरणी प्रथमच आपले मौन तोडताना, ‘सर्वधर्म ...

×