Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राजधानीत अभूतपूर्व सुरक्षा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राजधानीत अभूतपूर्व सुरक्षा

delhi-police_HIGH ALARTनवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीत यावर्षी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी दहशतवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका पत्करण्याच्या स्थितीत नाही.
देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन सोहळा यंदा धुमधडाक्यात साजरा करण्याची सरकारची योजना आहे. यानिमित्ताने देशभर तिरंगा यात्रा काढण्याची तयारीही भाजपाने केली आहे. स्वातंत्र्यदिनाचा देशातील मुख्य सोहळा लालकिल्ल्यावर होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्‌यात बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवादी संघटनांची तयारी असल्याची गुप्तचर खात्याची माहिती आहे.
पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य असल्याचे समजते. लालकिल्ल्यावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना आहे. त्यामुळे यंदा सुरक्षा यंत्रणा कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यातच स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्ली आणि नोएडात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा फोन अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोवरून आल्यामुळे सुरक्षा यंत्रणावरचा दबाव आणखी वाढला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षीच राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते, यंदा मात्र अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. लालकिल्ल्याचा संपूर्ण परिसर सुरक्षा यंत्रणांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. एसपीजी, निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांसोबत लष्करालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे निवासस्थान ते लाल किल्ल्यापर्यंतच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. लाल किल्याच्या परिसरातील सर्व उंच इमारती ताब्यात घेण्यात आल्या असून, या भागातील काही झाडेही सुरक्षेच्या दृष्टीने कापण्यात आल्याचे समजते. लाल किल्ल्याच्या परिसरात ९ हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या असून पीसीआर वाहनांवर पुरेशा प्रमाणात बुलेटप्रूफ जॅकेट ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
जगाच्या काही भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी जी पद्धत आणि साधनांचा उपयोग करण्यात आला, त्याचा विचार करून अशा कोणत्याही पद्धतीने होणारे हल्ले रोखण्याची तयारी सुरक्षा यंत्रणांनी केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29201

Posted by on Aug 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (122 of 2453 articles)


=केंद्राची राज्यांना सूचना= नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] - १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला प्लॅस्टिक तिरंग्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात ...

×