Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » स्वामींना संवेदनशील, गोपनीय दस्तावेज मिळाले कुठून?

स्वामींना संवेदनशील, गोपनीय दस्तावेज मिळाले कुठून?

=कॉंग्रेसचा सवाल=
subramanian-swamy_topnews.inनवी दिल्ली, [५ मे] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड मुद्यावर बुधवारी राज्यसभेत जोरदार रणकंदन झाल्यानंतर भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) असलेल्या संवेदनशील व गोपनीय फाईल्स मिळाल्या तरी कशा, असा सवाल कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी गुरुवारी उपस्थित केला.
पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना आनंद शर्मा म्हणाले की, बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान सीबीआय व ईडीच्या संवेदनशील दस्तावेजांचा हवाला कसा देण्यात आला. एक सन्माननीय, नव्हे असन्माननीय सदस्याला हे संवेदनशील दस्तावेज कसे मिळाले हे जाणून घेण्याचा सभागृहाला अधिकार आहे. शिवाय या दस्तावेजांचे प्रमाणीकरण करून ते पटलावर ठेवण्यास त्यांनी नकार दिला आहे, असे आनंद शर्मा म्हणाले.
उल्लेख करत असलेले सर्व दस्तावेज प्रमाणित करून सभागृहाच्या पटलावर ठेवा, या आपल्या निर्देशाचे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पालन केले नाही, तर कायदा आपले काम करेल, असे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस सदस्यांनी गदारोळ सुरू करताच संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी उभे झाले व डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी उल्लेख केलेले दस्तावेज प्रमाणित करून पटलावर ठेवले असल्याचे स्पष्ट केले. स्वामी यांनी त्याची काळजी घेतली आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28195

Posted by on May 6 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (369 of 2453 articles)


=सीमेपासून तीन किमी. दूर= नवी दिल्ली, [५ मे] - सीमेपलीकडे जमा झालेले अतिरेकी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी बर्फ वितळण्याची वाट पाहात ...

×