Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » स्वीडन जगातील पहिला कॅशलेस देश

स्वीडन जगातील पहिला कॅशलेस देश

  • सर्व व्यवहार मोबाईल बँकिंगनेच
  • लवकरच होणार शिक्कामोर्तब

mobile-bankingलंडन, [१७ ऑक्टोबर] – माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंगवर देण्यात येत असलेला भर आणि जवळजवळ संपुष्टात आलेले रोखीचे व्यवहार यामुळे स्वीडन हा जगातील पहिला ‘कॅशलेस’ देश म्हणून उदयास येण्याचे निश्‍चित झाले आहे, असे एका ताज्या अभ्यासात आढळून आले.
या देशात मोबाईल बँकिंगने आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण फार जास्त वाढले आहे. यामुळे रोखीने व्यवहार करण्याची सवय आता अनेकांना राहिली नाही. नजीकच्या भविष्यातच येथील प्रत्येक नागरिक केवळ मोबाईल बँकिंगचाच वापर करताना दिसणार आहे. असे झाल्यानंतर स्वीडन हा जगातील पहिला ‘कॅशलेस’ देश म्हणून उदयास येणार आहे, असे स्टॉकहोम येथील इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंट रिसर्च केंद्रातील संशोधक निकलस अरविंदसन यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
बहुतांश देशांमधील बाजारपेठांमध्ये रोख रक्कम हा अजूनही व्यवहारातील मुख्य घटक मानला जातो. परंतु, स्वीडनमधील सध्याचे चित्र लक्षात घेता, हा देश अशा आर्थिक व्यवहारांना अपवाद ठरणार आहे. कारण, या देशात किरकोळ स्वरूपाचा आर्थिक व्यवहारदेखील रोखीने न करता, मोबाईल बँकिंगच्याच माध्यमातून केला जात आहे. देशातील फारच कमी नागरिक रोखीने व्यवहार करीत आहेत. पण, त्यांचाही कल आता मोबाईल बँकिंगकडे वाढत आहे, असे या अभ्यासात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25187

Posted by on Oct 18 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1324 of 2458 articles)


=सुशीलकुमार मोदींचा लालूंवर हल्ला= पाटणा, [१७ ऑक्टोबर] - बिहारमध्ये मतदानाचे दोन टप्पे संपल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात होणार्‍या मतदानापूर्वीच्या प्रचारात आता चांगलाच ...

×