Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » हतिन क्याव यांचा शपथविधी

हतिन क्याव यांचा शपथविधी

=म्यानमारच्या अध्यक्षपदी विराजमान=
Htin Kyaw Myanmar's presidentनैपीताव, [३० मार्च] – लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांचे अनेक वर्षांपासूनचे समर्थक असलेले हतिन क्याव यांचा म्यानमारच्या अध्यक्षपदासाठी आज, बुधवारी शपथविधी पार पडला. त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल थीन सेन यांच्याकडून पदभार स्वीकारला, १ एप्रिलपासून ते आपला कार्यभार सांभाळतील. अनेक वर्षांच्या लष्करी राजवटीनंतर म्यानमारला लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले नागरी अध्यक्ष मिळाले असल्याने म्यानमारसाठी ही ऐतिहासिक घटना ठरली आहे.
लोकशाही आणण्यासाठी नोबेल पुरस्कार विजेत्या स्यू की यांनी म्यानमारमध्ये दीर्घकाळपर्यंत लढा दिला. मात्र, असे असूनही म्यानमारमधील कडक कायद्यानुसार स्यू की यांना राष्ट्रपतिपद भूषवण्यावर निर्बंध होते. त्यामुळे निवडणूकीत स्यू की यांच्या एनएलडी (राष्ट्रीय लोकशाहीवादी पक्ष) पक्षाने बहुमत मिळवल्यानंतर म्यानमारमधील जनतेला अपेक्षित असूनही स्यू की यांना राष्ट्राध्यक्षपद भूषवणे शक्य झाले नाही. त्यामुळे स्यू की यांनी अध्यक्षपदावर झालेली आपली निवड हाच आपला विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत आपले समर्थक असलेले क्याव यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्‍चित केले होते. म्यानमारमधील लोकप्रतिनिधींनीही क्याव यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये स्यू की यांच्या पक्षाने दोन्ही सभागृहांत बहुमत प्राप्त केले होते. मात्र, या दणदणीत विजयानंतरही स्यू की यांच्यावर घालण्यात आलेले कायदेशीर निर्बंध हटविण्यास लष्करी राजवटीने नकार दिला होता. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेनंतरही स्यू की यांच्यावरील निर्बंध मागे घेण्यास लष्कर प्रमुखांकडून नकार देण्यात आला. त्यानंतर क्याव यांची अध्यक्षपदी निवड करून आपण लोकशाहीवादी असल्याचा खणखणीत संदेश स्यू की यांनी दिला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील इतर दोन उमेदवारांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
आमचा देश बदलासाठी आसुसलेला आहे, असे मत राजकीय विश्‍लेषक खिन झॉ विन यांनी व्यक्त केले आहे. या नव्या बदलामुळे आता आमच्यासमोर उज्ज्वल भविष्य आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27640

Posted by on Mar 31 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (553 of 2458 articles)


धिरूभाई अंबानी यांचा मरणोत्तर सन्मान अनुपम खेर, सायना नेहवालला पद्मभूषण बहाल नवी दिल्ली, [२८ मार्च] - राष्ट्रपती भवनात झालेल्या ...

×