Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » हरयाणातील शेतकर्‍यांच्या किती जमिनी हडपल्या

हरयाणातील शेतकर्‍यांच्या किती जमिनी हडपल्या

=भाजपाचा कॉंगे्रसला खडा सवाल=
Venkaiah-Naiduनवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] – केंद्र सरकारचे भूमी अधिग्रहण विधेयक रोखल्याचा आनंद म्हणून ‘विजय रॅली’चे आयोजन करणार्‍या कॉंगे्रस पक्षावर सत्तारूढ भाजपाने आज शुक्रवारी जोरदार पलटवार केला. केंद्रात व हरयाणात कॉंग्रेसची सत्ता असताना, किती शेतकर्‍यांच्या जमिनी हडप केल्या, याचे उत्तर हा पक्ष देशाला देऊ शकेल का, असा परखड सवाल भाजपाने केला आहे.
भूमी अधिग्रहण विधेयक रोखून धरण्याची कृती खरोखरच विजयोत्सव साजरा करण्यासारखी आहे का, शेतकर्‍यांच्या हिताच्या गोष्टी करणार्‍या कॉंगे्रसने आपल्या सत्ताकाळात किती शेतकर्‍यांच्या जमिनींची लूट केली आहे आणि ज्या जमिनी हडपल्या, त्यासाठी शेतकर्‍यांची परवानगी घेतली होती का, यावर सर्वप्रथम स्पष्टीकरण द्यायला हवे, असा हल्ला केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू आणि ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी आज शुक्रवारी येथे आयोजित संयुक्त पत्रपरिषदेत चढविला
‘आधी देशापुढे सत्यता विशद करा, नंतर विजय रॅली काढा, आधी केलेल्या पापांचा पाढा वाचा, नंतर आनंद साजरा करा… हरयाणातील शेतकर्‍यांना कसे आणि किती लुटले, या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी आम्ही तुम्हाला दोन दिवसांची मुदत देत आहोत. शेतकर्‍यांच्या जमिनी लुटण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करणारे तुमचेच माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांना उत्तर विचारा आणि देशवासीयांना सत्य सांगता,’ अशी चपराक नायडू यांनी हाणली.
शेतकर्‍यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा कॉंगे्रसचा प्रयत्न आहे. देशात ५० वर्षे राज्य करताना या पक्षाने १८९४ च्या ब्रिटिशकालीन कायद्याचा वापर करून शेतकर्‍यांची निव्वळ फसवणूक केली आहे. संपुआ सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळातही या पक्षाने लूट करण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही, असा आरोप नायडू यांनी केला.
भूपिंदरसिंह हुडा यांनी आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात विशेष आर्थिक झोन आणि अन्य औद्योगिक कारणांसाठी शेतकर्‍यांच्या ७८,६९५ हेक्टर्स जमिनीची अक्षरश: लूट केली आहे. या जमिनीचा अजूनही योग्य उपयोग झाला नाही, असा पलटवार चौधरी वीरेंद्रसिंह यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23893

Posted by on Sep 19 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1449 of 2453 articles)


=कॉंगे्रसजनांनाही पडली भुरळ, सर्वेक्षणातील वास्तव= नवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] - केंद्रातील सत्ता गेल्याने निराश झालेला कॉंगे्रस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×