Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » हल्ले कदापि सहन करणार नाही

हल्ले कदापि सहन करणार नाही

=पंतप्रधानांचा इशारा=
NARENDRA MODI39हैदराबाद, [८ ऑगस्ट] – कोणाला हल्ला करायचा असेल तर माझ्यावर करा, गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, परंतु दलित बांधवांवरील हल्ले कदापि सहन करणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे दिला.
दलित बांधवांच्या जागी मी हल्ला झेलण्यास किंवा गोळी खाण्यास तयार आहे, असे सांगतानाच जाती आणि समुदायाच्या आधारे समाजात दुफळी निर्माण होऊ देणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. समाजाने दीर्घ काळ उपेक्षा केलेल्या दलितांचे रक्षण आणि सन्मान करा, असे भावनिक आवाहन पंतप्रधान मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
दलितांवर हल्ले करण्याचा खेळ आता बंद झाला पाहिजे. जर देशाला प्रगतीच्या वाटेवर न्यायचे असेल तर शांतता, एकता आणि सद्‌भावना या मुख्य मंत्राची उपेक्षा करता येणार नाही. एकता हाच देशाच्या विकासाचा मुख्य स्रोत आहे, असेही मोदी म्हणाले. काही घटनांकडे बघून खूप दु:ख होते, असे सांगतानाच दलितांचे संरक्षण आणि त्यांचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी असली पाहिजे. ही एक सामाजिक समस्या आहे याची मला जाणीव आहे. हा पापाचा परिणाम आहे आणि त्याने समाजात घर केले आहे. परंतु, आम्ही अतिरिक्त सावधगिरी बाळगून समाजाला अशाप्रकारच्या धोक्यापासून वाचविण्याची गरज आहे. जात, धर्म, पंथ आणि सामाजिक दर्जा या आधारे विभाजन योग्य नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. या सामाजिक समस्येवर तोडगा काढण्यास जे उत्सुक आहेत त्यांनी समाजात विभाजन करणारे राजकारण सोडावे. विभाजनाच्या राजकारणामुळे देशाचे काहीही भले होणार नाही, असेही मोदी म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तथाकथित गौरक्षकांवर पुन्हा एकदा हल्ला चढविला. गोवध हा वेगळा प्रकार आहे. परंतु, या नावाखाली तथाकथित गौरक्षकांनी जे कृत्य सुरू केले आहे त्यावर राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29172

Posted by on Aug 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (134 of 2453 articles)


नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] - बसपाचे माजी महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. उत्तरप्रदेश विधानसभा ...

×