Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » हवाई दलाला मिळाले पहिले तेजस

हवाई दलाला मिळाले पहिले तेजस

=संरक्षण मंत्र्यांनी दिली गोड भेट, भारताच्या युद्ध सामर्थ्यात वाढ=
Tejasबंगळुरू, [१७ जानेवारी] – स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेले तेजस हे हलके लढाऊ विमान आज शनिवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याहस्ते भारतीय वायुसेनेच्या बेड्यात सामील करण्यात आले. या विमानाला सेवेत सामावून घेण्यासाठी वायुसेनेला तब्बल ३२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
सुमारे ३२ वर्षांपूर्वी या विमानाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. पण, या ना त्या कारणामुळे विमानांची निर्मिती रखडली होती. अखेर शनिवारी पहिले तेजस विमान वायुसेनेच्या बेड्यात दाखल झाले. या विमानाच्या उत्पादनासाठी आठ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. डीआरडीओ आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या तेजसच्या संपूर्ण उपक्रमावर सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कोणत्याही हवामानाचा या विमानावर परिणाम होणार नाही, शिवाय वजनाने ते अतिशय हलके असल्याने युद्धात वापरण्यासही ते सोयीचे आहे. हवाई दलात सामील करण्यासाठी सध्या या विमानाला प्राथमिक स्तरावर दुसरी मंजुरी देण्यात आली असून, अंतिम मंजुरी याच वर्षीच्या अखेरीस देण्यात येण्याची शक्यता आहे, असे संरक्षण मंत्रालयातील सूत्राने सांगितले. याआधी पहिली मंजुरी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला विमानाची बांधणी करण्यासाठी प्रदान करण्यात आली होती.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तेजसच्या उत्पादन मालिकेतील पहिले विमान हवाई दलाच्या स्वाधीन केले. तेव्हा एअर चीफ मार्शल अरुप राहा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आजचा दिवस देशासाठी फार मोठा आणि महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया डीआरडीओच्या अधिकार्‍याने व्यक्त केली तर, तेजस प्रकल्पात सहभागी झालेल्या आणि भारताची युद्धक्षमता वाढविण्यात मोलाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ व कर्मचार्‍यांचे संरक्षण मंत्र्यांनी अभिनंदन केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19800

Posted by on Jan 18 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2213 of 2453 articles)


=जावडेकर यांचा विश्‍वास= जयपूर, [१७ जानेवारी] - देशात भाजपाचा विस्तार सातत्याने होतच राहाणार आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत देशातील किमान ...

×