Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » हाजी अली दर्ग्यात देसाईंना मिळेल चपलेचा प्रसाद

हाजी अली दर्ग्यात देसाईंना मिळेल चपलेचा प्रसाद

=शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांचा इशारा=
Trupti Desai-Haji-ali-shaikhनवी दिल्ली, [२३ एप्रिल] – हाजी अली दर्ग्यातील मजारवर जाण्याचा प्रयत्न केल्यास भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना चपलेचा प्रसाद देऊ, अशी धमकीच शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिल्याने आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
ही आपली वैयक्तिक भूमिका असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असाही खुलासाही शेख यांनी केला आहे. तसेच शेख यांच्या धमकीला न जुमानता देसाईंनीही त्यास प्रत्युत्तर देत, कुणीही चपलेने मारण्याइतकी आया-बहिणींची इज्जत रस्त्यावर आलेली नाही, असे ठणकावले आहे. तसेच अनेक संघटना आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीही आपल्यासोबत असल्याचा दावा देसाईंनी केला आहे.
शनिचौथरा, कोल्हापूर व त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन छेडून देसाई यांनी ते यशस्वीही केले. मुंबई उच्च न्यायालयानेही या आंदोलनाचा निकाल देत, ज्या ठिकाणी पुरुष जाऊ शकतात तेथे महिलाही जाऊ शकतात, असे सांगितले होते. त्यानंतर मंदिराच्या गर्भगृहाची दारे महिलांना खुली झाली. या पार्श्‍वभूमीवर आता मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी धरणे धरण्याची घोषणा देसाईंनी केली आहे. हाजी अली सबके लिए या फोरमच्या माध्यमातून त्या २८ एप्रिलपासून आंदोलन करणार आहेत.
देसाईंच्या या पवित्र्यावर हाजी अराफत शेख मात्र अत्यंत आक्रमक झाल्याचे दिसते. हाजी अली दर्ग्यात महिलाच काय, कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना प्रवेश आहे. मात्र, मजार परिसरात देसाईंनी जाण्याचा प्रयत्न करू नये, तसे केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ, असा इशारा शेख यांनी दिला आहे. आम्हाला महिलांबद्दल आदर आहे. परंतु, शरियत कायद्यानुसार महिलांना मजारवर जाता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी देसाई नको ते विषय उकरून काढत असल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याऐवजी देसाईंनी स्त्री शिक्षण, महिला सुरक्षा, स्त्री भ्रूणहत्या यासारखे गंभीर प्रश्‍न हाताळावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी पक्षाची भूमिका मांडत, मंदिर असो; मशीद असो किंवा दर्गा, तेथे महिला व पुरुषांना समान अधिकार असायला हवेत, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट केले आहे व शेख यांनी मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असून शिवसेनेचे त्यास समर्थन नाही, असा खुलासा केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27969

Posted by on Apr 24 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (445 of 2452 articles)


मुंबई, [२३ एप्रिल] - यंदा चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाचा पाऊस शंभर टक्क्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पडणार ...

×