Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » हाफिझला पाठीशी घालणे बंद करा

हाफिझला पाठीशी घालणे बंद करा

=भारताने पाकला सुनावले=
vikas swaroopनवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] – पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईदने भारताविरोधात पुन्हा गरळ ओकल्याच्या पार्श्‍वभूमीवर, भारताने कठोर भूमिका घेतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला कठोर शब्दात समज दिली आहे. ‘हाफिझच्या भडकाऊ भाषणांवर आणि त्याच्या कारवायांवर पाकने लगाम घालायला हवी. पाकच्या पाठिंब्यानेच सईद ही हिंमत करू शकतो,’ अशा शब्दात भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गुरुवारी हाफिझ सईदने जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार, त्याने पठाणकोटसारखे आणखी काही हल्ले करण्याची धमकी दिली होती. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सईदने खुलेपणाने ही धमकी दिली होती. ‘सईदने अशाप्रकारच्या धमक्या देणे भारताला मंजूर नाही. पाकिस्तानने जबरीने का होईना पण त्याच्या जमिनीवरून भारताच्या विरोधातील ही ‘आतंकवाणी’ बंद करावी. सईद हा आंतरराष्ट्रीय स्तराचा घोषित दहशतवादी आहे. सईदवर पाकने लगाम कसायलाच हवी,’ असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले आहे. शिवाय सध्याच उभय राष्ट्रांमध्ये चर्चेची तारीख निश्‍चित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26733

Posted by on Feb 6 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (858 of 2453 articles)


नवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] - कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ २०१५-१६ या वर्षासाठी, नऊ टक्के व्याजदर देण्याची शक्यता आहे. ...

×