Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » हायकोर्टाचा नेस्लेला दणका

हायकोर्टाचा नेस्लेला दणका

=मॅगीवरील बंदी कायम=
Bombay-High-Courtमुंबई, [१२ जून] – नेस्ले कंपनीच्या मॅगीमध्ये एमसीजी व शिसे हे घातक पदार्थ आढळल्याने मॅगीच्या अनेक उत्पादनांवर महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत बंदी घालण्यात आली आहे. या बंदी विरोधात नेस्ले इंडियाने काल गुरुवारी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मॅगीवरील बंदी कायम राहणार आहे.
दिल्लीच्या फूड सेफ्टी अँड स्टॅडर्ड तर्फे नुकतीच मॅगीच्या नऊ प्रकारच्या उत्पादनांवर बंदी घालून बाजारातून मॅगीचा सर्व साठा मागे घेण्याचा आदेश देण्यात आला होता. या आदेशाला नेस्लेकडून मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले. यावर आज सुनावणी झाली.
न्यायाधीश विद्यासागर कानडे व न्यायाधिश बी. पी. कोलाबावाला यांनी याची सुनावणी करताना सांगितले की, सरकारी संस्थेने घातलेली बंदी योग्य आहे की अयोग्य हे ठरविण्यासाठी त्यांचा अहवाल मिळायला हवा. त्यासाठी याबाबत आदेश काढले , त्यामुळे या संस्थेने मॅगीच्या ९ नमुन्यांची तपासणी केली आहे. या तपासण्यांचा अहवाल पंधरा दिवसात हायकोर्टाकडे सादर करावा. त्यानंतरच नेस्लेच्या याचिकेवर विचार करता येईल. याप्रकरणी पुढील सुनावणी ३० जून रोजी ठेवली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22852

Posted by on Jun 13 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1624 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१२ जून] - ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरधर गमांग यांनी आज शुक्रवारी येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची ...

×