Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » हा ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा कळस!

हा ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा कळस!

  • कट्टर हिंदुत्वाचा विरोध अन् दहतशवाद्यांचा बचाव
  • तस्लिमा नसरीनचा संताप

taslima nasreen2नवी दिल्ली, [१७ ऑक्टोबर] – रोखठोक आणि वादग्रस्त लिखाण करणार्‍या आणि त्यासाठी स्वकियांच्याच रोषाचा सामनाही करणार्‍या प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांनी भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांवर कडाडून हल्ला चढविला आहे. जे लोक स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत आहेत, ते कट्टर हिंदुत्वावर नेहमीच टीका करतात आणि कट्‌टरवादी मुस्लिमांच्या दहशतवादासारख्या घृणास्पद कृत्यांचे समर्थन करताना दिसत आहेत, असा संताप नसरीन यांनी व्यक्त केला.
भारतात सध्या जी धर्मनिरपेक्षता पाहायला मिळत आहे, ती अजिबात योग्य नाही. मुस्लिमांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून धर्मनिरपेक्षतेचे हे ठेकेदार हिंदूंचे विरोधक आणि मुस्लिमांचे समर्थक आहेत, असे सांगताना नसरीन यांनी वाढत्या असहिष्णुतेचा निषेध करून पुरस्कार परत करण्याची साहित्यिकांची कृती काही प्रमाणातच योग्य असल्याचे मत एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
भारतातील राजकीय नेते केवळ मतांसाठीच मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्यक्षात त्यांना मुस्लिमांविषयी पुळका नसतो. यात मुस्लिमांना फार जास्त महत्त्व मिळत असल्याने बहुसंख्य हिंदू नाराज होतो. अनेक वेळा पूर्वग्रहामुळे मुस्लिमांवर अन्याय होतो. पण, हीच बाब अन्य धर्माबाबतही लागू होते. २०१३ मध्ये पश्‍चिम बंगालच्या एका गावात मुसलमानांनी हिंदूंच्या घरांना आगी लावल्या होत्या. तेव्हा कुणीच काही बोलले नव्हते. पण, हीच घटना जर मुस्लिमांबाबत झाली असती, तर सारेच धर्मनिरपेक्षवादी पेटून उठले असते. भारतात मुस्लिमांवर खरोखरच अत्याचार झाले असते, तरे फाळणीप्रमाणेच भारत सोडून पाकिस्तान किंवा बांगलादेशात राहायला गेले नसते का, असा सवालही त्यांनी केला.
आज सहिष्णूतेच्या नावाखाली लेखक पुरस्कार परत करीत आहेत. पण, पश्‍चिम बंगालमध्ये जेव्हा माझ्या पुस्तकावर बंदी घातली गेली, माझ्या विरोधात पाच फतवे निघाले, मला पश्‍चिम बंगालमधून हाकलण्यात आले, दिल्लीत माझ्या घरात मला नजरकैद करण्यात आले, तेव्हा लेखक गप्प का बसले होते, असा संतप्त सवालही नसरीन यांनी उपस्थित केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25194

Posted by on Oct 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1317 of 2453 articles)


कर्नाटक कॉंग्रेसमधील संघर्ष उफाळला सोनिया गांधींनी बजावला समन्स नवी दिल्ली, [१७ ऑक्टोबर] - कर्नाटक कॉंगे्रसमधील वाद आता चव्हाट्यावर आला ...

×