Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » हा दहशतवादी गटांना इशाराच : जावडेकर

हा दहशतवादी गटांना इशाराच : जावडेकर

javdekar prakash 2नवी दिल्ली, [१० जून] – म्यानमारमधील लष्करी कारवाई हा शेजारील सर्वच देशांमध्ये आश्रयात असलेल्या दहशतवादी गटांना एकप्रकारचा इशाराच आहे. आमच्या भूमीत शेजारील देशातून जेव्हाजेव्हा दहशतवादी हल्ला होईल, तेव्हा त्या दहशतवादी गटांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे इतर अतिरेकी गटांनी भारतावर हल्ला करण्यापूर्वी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद ही जागतिक समस्या आहे आणि भारतावर जर वारंवार हल्ले होत असतील, तर भौगोलिक सीमा ओलांडण्यासाठी भारत मुळीच मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
दहशतवाद खपवून घेणार नाही : गडकरी
कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया भारत कदापि खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, राष्ट्रीय महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी दिला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी मंगळवारी सकाळी म्यानमारमध्ये पार पाडलेल्या लष्करी मोहिमेवर कोणतेही भाष्य केले नाही. या मोहिमेसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले का, या प्रश्‍नालाही त्यांनी दुर्लक्षित केले. मंगळवारी सकाळी लष्कराने जी मोहीम यशस्वीपणे राबविली, त्यावर आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याने, पंतप्रधानांचे अभिनंदन करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. केंद्रातील भाजपा सरकार दहशतवाद कदापि सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश आम्ही सुरुवातीलाच दिला होता, असे गडकरी यांनी सांगितले. भविष्यात भारतावर अशाप्रकारचा दहशतवादी हल्ला झाल्यास आपले सरकार अशाच प्रकारे लष्करी कारवाई करणार का, असा प्रश्‍न त्यांना वारंवार विचारण्यात आला होता.
म्यानमारमधील मोहिमेत नेमके किती अतिरेकी ठार झाले, याबाबतची स्पष्ट माहिती लष्कराने अद्याप दिलेली नाही, याकडे लक्ष वेधले असता, ही माहिती केवळ लष्कराचा अधिकृत प्रवक्ताच देईल. सरकार याबाबत कोणतेही भाष्य करणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22805

Posted by on Jun 11 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1638 of 2453 articles)


=दिग्विजयसिंह पुन्हा बडबडले= नवी दिल्ली, [१० जून] - वाचाळ आणि वादग्रस्त बडबड करण्यासाठी प्रसिद्ध असलेले कॉंगे्रस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पुन्हा ...

×