Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा पराभव : शर्मा

हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा पराभव : शर्मा

Anand-Sharmaनवी दिल्ली, [२४ जून] – अण्वस्त्र पुरवठादार गटात (एनएसजी) प्रवेश न मिळण्याचा निर्णय भारतासाठी लाजीरवाणा असल्याची टिका कॉंग्रेस पक्षाने केली आहे. हा सरकारच्या मुत्सद्देगिरीचा पराभव असल्याचेही कॉंग्रेस पक्षाने म्हटले आहे.
या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:चा आणि देशाचाही विनाकारण तमाशा केला, त्यामुळे देशाला कारण नसतांना लाजीरवाण्या स्थितीचा सामना करावा लागला, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी आज पत्रकारांशी बोलतांना म्हटले. एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी सदस्य देशांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भारताने अनावश्यक उत्साह दाखवला, असा आरोप करत शर्मा म्हणाले की, मुत्सद्देगिरीत अधिक अभ्यासाची आणि गांभीर्याची गरज असल्याचे आतातरी पंतप्रधान मोदी यांनी लक्षात घेतले पाहिजे.
एनएसजीच्या सदस्यत्वाच्या मुद्यावर सदस्यत्व मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर भारताला आपली निराशा लपवता आली नाही, याकडे लक्ष वेधत शर्मा म्हणाले की, मात्र या मुद्यावर भारताने आपली तुलना पाकिस्तानशी होऊ दिली हे दुर्देवी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28768

Posted by on Jun 25 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (187 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२४ जून] - युरोपीयन समुदायातून बाहेर पडण्याच्या जनमत संग्रहाच्या ब्रिटनच्या निर्णयानंतर दिल्लीतही जनमत संग्रह घेण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री ...

×