Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » हिंदी भाषा प्राचीन व आधुनिक काळाचा दुवा

हिंदी भाषा प्राचीन व आधुनिक काळाचा दुवा

=राष्ट्रपतींचे प्रतिपादन=
Pranab-Mukherjee2नवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] – भारताची प्राचीन संस्कृती आणि आधुनिक काळाची प्रगती यातील मुख्य दुवा म्हणजे आपली हिंदी भाषाच आहे. संयुक्त राष्ट्रातही अधिकृत भाषा म्हणून लवकरच हिंदीला मान्यता मिळेल, असा आपल्याला विश्‍वास आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सोमवारी केले.
हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यापासून हिंदी भाषेने आतापर्यंत अनेक मैलाचे दगड गाठले आहेत. भारतीय विचार आणि संस्कृतीचा प्रचार करणार्‍यांनाच याचे खरे श्रेय द्यायला हवे.
आपले पारंपरिक ज्ञान, प्राचीन संस्कृती आणि आजचा आधुनिक काळ यातील सर्वांत महत्त्वाचा दुवा म्हणून हिंदी भाषा आपले कार्य उत्तमरीत्या पार पाडत आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातही हिंदीचा वापर वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, जेणेकरून या क्षेत्रात सहभागी होणार्‍या प्रत्येकाला देशाच्या विकासात योगदान करण्याची संधी मिळू शकेल, असेही राष्ट्रपती म्हणाले. त्यांनी यावेळी हिंदीच्या प्रचारासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या व्यक्ती व शासकीय संस्थांना हिंदी पुरस्कार प्रदान केले.
झपाट्याने बदलत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत हिंदी भाषेचे स्वत:चे वेगळेच महत्त्व आहे. कारण, जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेले लाखो भारतीय देशाचा उर्वरित जगाशी संबंध जोडणारी माध्यम भाषा म्हणून हिंदीचाच प्रभावीपणे वापर करीत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही हिंदीला ओळख प्राप्त झाली आहे. आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनीच एक दिवस संयुक्त राष्ट्रसंघातही हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळेल, असा मला विश्‍वास असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
हिंदीला महत्त्व मिळावे : राजनाथसिंह
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी आयुष्याच्या विविध स्तरांवर हिंदीला पाहिजे तसे महत्त्व मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. हिंदीला जो सन्मान मिळायला हवा, तो दिला जात नाही. काही कथित बुद्धिजीवी अजूनही इंग्रजीवरच भर देत असतात. माझ्या कोणत्याही भाषेला विरोध नाही. पण, राष्ट्रभाषा म्हणून देशाच्या प्रत्येक भागाला जोडणार्‍या हिंदीचा प्रचार करायलाच हवा, असे राजनाथसिंह म्हणाले.
देशातील ७५ टक्के लोक हिंदी बोलतात किंवा त्यांना हिंदी भाषा समजते. देशातील प्रत्येक गावामध्ये लोक एकतर आपल्या मातृभाषेत किंवा हिंदीत बोलत असतात. त्यांना इंग्रजी कळत नाही, असे सांगताना, हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची मागणी बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या गैर-हिंदीभाषक नेत्याकडूनच झाली होती, अशी आठवणही करून दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23794

Posted by on Sep 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1477 of 2453 articles)


=दर उणे ४.९५ टक्के, इंधन, भाजीपाला स्वस्त, कांदा मात्र महागच= नवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] - कांदा अजूनही गृहिणींना रडवत असला, ...

×