Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » हिंदूंचा शांतता, सलोख्यावर विश्‍वास

हिंदूंचा शांतता, सलोख्यावर विश्‍वास

=दलाई लामा यांचे प्रतिपादन=
The Dalai Lama gestures before speaking to students during a talk at Mumbai Universityजालंधर, [१५ नोव्हेंबर] – गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी असलेला भारत हा अहिंसेवर विश्‍वास ठेवणारा देश असून, या देशातील बहुसंख्य हिंदूंचा आजही शांतता आणि सलोख्यावर विश्‍वास असल्याचे प्रतिपादन तिबेटियन धर्मगुरू व नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले दलाई लामा यांनी केले आहे.
शांतता व सलोखा हीच भारताची सर्वांत मोठी परंपरा राहिली आहे. हिंदू समुदायामधील बहुसंख्य नागरिकांचा अजूनही शांतता आणि सलोख्यावर विश्‍वास आहे. या देशात सर्वत्र सहिष्णुता आहे, असे नुकत्याच शांततेत पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या सलोख्यामुळेच धार्मिक सहिष्णुतेचा देश म्हणून भारताची जगभरात ओळख आहे, दलाई लामा यांनी स्पष्ट केले.
सर्व धर्म व व्यक्तींना येथे समान आदर व सन्मान मिळतो. धार्मिक सहिष्णुता म्हणजे केवळ धर्मांचा आदर करणे नव्हे, तर सर्व व्यक्तींचाही आदर करणे होय. भारतामध्येच बुद्ध धर्माची स्थापना झाली होती. यामुळे भारत हा सर्व बौद्धांसाठी गुरूस्थानी आहे, असे दलाई लामा यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25458

Posted by on Nov 16 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1240 of 2453 articles)


लंडन, [१४ नोव्हेंबर] - डॉ. बाबासोहब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ...

×