Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » हिंदूंना खोरे सोडण्याचे फर्मान

हिंदूंना खोरे सोडण्याचे फर्मान

=लष्कर-ए-इस्लामची धमकी=
jammu-kashmir-map-6श्रीनगर, [६ ऑगस्ट] – सुमारे अकरा महिने शांत राहिल्यानंतर लष्कर-ए-इस्लामने पुन्हा डोके वर काढले असून, खोरे रिकामे करा अन्यथा मरण्यासाठी तयार व्हा, अशी धमकी काश्मिरी हिंदूंना दिली आहे.
८ आणि ९ जुलै रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथील विस्थापित काश्मिरी हिंदूंंच्या कॉलनीवर दहशतवादी समर्थक जमावाने तुफान दगडफेक केली होती. त्याच भागात लष्कर-ए-इस्लामने धमकी देणारे फलक लावले आहेत. आठ जुलैच्या रात्री काश्मिरी हिंदूंची रिकामी घरे पाकिस्तान समर्थक जमावाने जाळून टाकली होती. अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. एम. सहाय यांनी या घटनेला दुजोरा दिला होता.
उर्वरित काश्मिरी हिंदूंनाही लष्कर-ए-इस्लामच्या पोस्टर्समधून धमकी देण्यात आली आहे. संगणकावर तयार करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये वरच्या डाव्या भागात दहशतवादी संघटनेचा झेंडा व लोगो आहे. रा. स्व. संघाचे एजंट व काश्मिरी हिंदूंनी खोरे सोडून दिले पाहिजे. काश्मीरला इस्रायल बनविण्याची किंवा मग मुस्लिमांची कत्तल करण्याची इच्छा असणार्‍या हिंदूंंना खोर्‍यात काहीही स्थान नाही. तुम्ही आपली सुरक्षा दुप्पट, तिप्पट करा. तुम्ही मरणारच, अशी धमकी यामध्ये देण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29163

Posted by on Aug 7 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (136 of 2452 articles)


=कामकाज चालू देण्यासाठी विरोधकांना आवाहन= नवी दिल्ली, [१७ जुलै] - जीएसटी विधेयक राष्ट्रीय महत्त्वाचे आहे, त्यामुळे राजकारणाच्या वर उठून हे ...

×