Home » ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » हिंदूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ

हिंदूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ

=सरसंघचालकांचे प्रतिपादन=
dr.mohanbhagwatनवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] – भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि देशातील सर्व हिंदूंना एकत्र आणण्यासाठी सध्याची वेळ अतिशय अनुकूल आहे. हिंदूंना एकत्र आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
रवींद्रनाथ टागोर यांचा हवाला देत सरसंघचालक म्हणाले की, ‘‘हिंदू आणि मुस्लिम यांच्यात जेव्हाजेव्हा संघर्ष उफाळून येतो तेव्हा मध्यम मार्ग समोर येतो आणि तो म्हणजे हिंदुत्व’’. मेरठ आणि गाझियाबाद येथे झालेल्या रा. स्व. संघाच्या शिबिराला ते संबोधित करीत होते. ‘‘भारत हे हिंदू राष्ट्रच आहे आणि हीच वास्तविकता आहे. याच संकल्पनेने आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. या हिंदू राष्ट्राला आणखी महान करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. जेव्हा आपला देश महान होईल, तेव्हा त्याचा फायदा संपूर्ण जगालाच मिळेल,’’ असेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
नेमके काय करायचे आहे, याची माहिती आपल्याला असायलाच हवी. आपण जर आपसातच भांडत राहिलो, तर राज्यघटनादेखील आपले रक्षण करू शकणार नाही, असे ते म्हणाले. सरसंघचालकांनी यावेळी प्रतिकूल काळाचीही आठवण करून दिली. रा. स्व. संघाचे संस्थापक केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी संपूर्ण हिंदू समाज एकत्र आणण्यासाठी संघाच्या शाखा सुरू केल्या होत्या. पण, आता संघासाठी फारच अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे देशातील सर्व हिंदूंना एकत्र आणण्याच्या दृष्टीने हीच योग्य वेळ आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
जगाच्या पाठीवरील कोणत्याही स्वयंसेवक संघाला इतका कडवा विरोध सहन करावा लागला नसेल, जितका आपण आपल्याच देशात सहन करीत आहोत. त्यामुळे कठीण परिस्थितीतही आपण समोर वाटचाल करायलाच हवी. एक काळ असाही होता की, आपल्याच देशात काय, जगात कुठेही संघाची विचारधारा मान्य केली जात नव्हती. आता मात्र काळ बदलला आहे. संघासाठी सध्याचा काळ अतिशय पोषक आहे. संघाने प्रचंड संघर्ष केला आहे. त्यामुळेच आज ही अनुकूल स्थिती आली आहे. याचा अर्थ आता आपण निवांत व्हायला हवे, असा मुळीच नाही. तर आणखी जोमाने काम करण्यासाठी स्वत:ला सज्ज करावे लागणार आहे. आपला देश विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे आपण सर्वच धर्मांचा सन्मान करायला हवा. जगात हिंदुत्व ही एकमेव संकल्पना सर्वांना एकत्र आणू शकते, असेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20460

Posted by on Feb 10 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (2081 of 2455 articles)


लखनौ, [९ फेब्रुवारी] - वाराणसीतील काशी विश्‍वनाथ मंदिराला दररोज लाखो भक्त आणि पर्यटक भेट देत असतात. त्यांना आवश्यक त्या सुविधा ...

×