Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » हिंदूंवर अत्याचार मान्य नाही

हिंदूंवर अत्याचार मान्य नाही

=कठोर शिक्षा करण्याचा नवाज शरीफांचा इशारा=
Pakistan Prime Minister Nawaz Sharifकराची, [१२ नोव्हेंबर] – मी कोणत्या एका धर्माचा नाही, तर पाकिस्तानमध्ये राहणार्‍या प्रत्येक समुदायांचा पंतप्रधान आहे. केवळ मुस्लिमच नव्हे, तर हिंदूंसह प्रत्येक धर्मातील नागरिक हे माझेच आहेत. त्यामुळे कुणी जर अल्पसंख्यक हिंदूंवर अत्याचार करीत असेल, तर माझे सरकार ते कदापि मान्य करणार नाही. अत्याचारी मुस्लिम धर्मातील असला, तरी त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिला आहे.
गेल्या महिन्यात अमेरिका दौर्‍याच्या काळात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि विदेश मंत्री जॉन केरी यांच्याकडून दहतशवादासह पाकमध्ये अल्पसंख्यकांवर होणार्‍या अत्याचाराच्या मुद्यावरून खडसावण्यात आल्यानंतर नवाज शरीफ चांगलेच ‘शरीफ’ झाल्याचेच दिसून येत आहे. यामुळेच त्यांनी भारताच्या ‘मोस्ट वॉण्टेड’ यादीत असलेल्या हाफिज सईद आणि त्याच्या जमात-उद-दावा या संघटनेलाही दहशतवादी म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर आता त्यांनी हिंदू व अन्य अल्पसंख्यकांवर होणारे अत्याचार रोखण्याचा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचा संकल्प घेतला असल्याचे दिसते.
पाकमध्ये अल्पसंख्यकांवर हल्ला झाल्यास हल्लेखोर मुस्लिम असल्याचे दिसून आले, तर त्याच्याविरोधातही आपले सरकार कठोर कारवाई करणार आहे. पाकमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन मुळीच मान्य करणार नाही, असे शरीफ यांनी दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25402

Posted by on Nov 13 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1260 of 2458 articles)


=मुशर्रफांनी उधळली मुक्ताफळे= इस्लामाबाद, [२८ ऑक्टोबर] - जम्मू-काश्मिरात पाकिस्तानचेच दहशतवादी आहेत आणि लष्कर-ए-तोयबा आमचीच निर्मिती आहे, अशी जाहीर कबुली दिल्यानंतर ...

×