Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » हिंदूराष्ट्राला मुस्लिमांचा विरोध नाही

हिंदूराष्ट्राला मुस्लिमांचा विरोध नाही

=शिव-पार्वती आमचेही आई-वडील : जमियतचे मुफ्ती मोहम्मद इलियास यांचे मत=
Jamiat Ulema's Mufti Muhammad Ilyasअयोध्या, [१९ फेब्रुवारी] – भारत हे हिंदू राष्ट्र आहे, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्पनेला या देशातील मुस्लिमांचा मुळीच विरोध नाही, असे स्पष्ट करतानाच भगवान महादेव हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते आणि मुस्लिमांना हे मान्य करण्यात कुठलीच अडचण नाही. मुस्लिमदेखील सनातनी आहेत आणि हिंदूंचे देव असलेले शंकर-पार्वती आमचेही आई-वडील आहेत, असे मत जमियतचे उलेमा मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी व्यक्त केले.
चीनमध्ये राहणारा चीनी, अमेरिकेत राहणारा अमेरिकन असतो, त्याचप्रमाणे हिंदुस्थानात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. हे राष्ट्रावरून पडलेले नाव आहे. जर आमचे आई-वडील, रक्त आणि देश एक आहे, तर आमचा धर्मही एकच आहे, असेही मुफ्ती मोहम्मद इलियास म्हणाले. यावेळी इलियास यांच्या नेतृत्वाखालील एका मुस्लिम शिष्टमंडळाने दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.
जमियत उलेमाचे एक शिष्टमंडळ बुधवारी अयोध्येत आले होते. जमियतचे उलेमा येत्या २७ फेब्रुवारी रोजी बलरामपूर येथे धार्मिक एकतेवर एक कार्यक्रम आयोजित करीत आहेत. याच कार्य्रमात अयोध्येतील संतांना आमंत्रित करण्यासाठी हे शिष्टमंडळ अयोध्येत आले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20743

Posted by on Feb 20 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2037 of 2453 articles)


मुंबई, [१९ फेब्रुवारी] - सरकारी शिवजयंती पुढच्या वर्षी तिथीनुसारच साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष ...

×