Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » हिंदू धर्मात सर्व समस्यांवर तोडगा

हिंदू धर्मात सर्व समस्यांवर तोडगा

=भाजपाध्यक्षांचे प्रतिपादन=
AmitShah-Varanasiअहमदाबाद, [२९ जून] – संपूर्ण जगाला आज भेडसावत असलेल्या सर्वच समस्यांवर केवळ हिंदू धर्मातच तोडगा आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज सोमवारी येथे केले.
मी जन्माने हिंदू आहे म्हणून हे वक्तव्य करीत नाही. तर प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. तब्बल दोन वर्षे मी प्रचंड त्रास सहन केला आहे. या काळात आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी देशातील सर्वच हिंदू धार्मिक स्थाने आणि श्रद्धास्थळांना भेटी दिल्या. सर्वच ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले आणि शक्तिपीठांचे आशीर्वाद घेतले. साधू-संतांचे मार्गदर्शन घेतले. हिंदू परंपरांना नवे स्वरूप देण्याचे कार्य साधू-संतांनी केल्याचे मला जाणवले. गुजरातचा असूनही मी सोमनाथ मंदिरात गेलो नाही. कारण, सोहराबुद्दिन शेख कथित चकमकप्रकरणी माझ्यावर गुजरात प्रवेशबंदी लादण्यात आली होती, असे अमित शाह यांनी गुजरात विद्यापीठ दीक्षांत केंद्रात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘ट्रान्ससेंडेन्स : माय स्पिरीच्युअल एक्सपीरिअन्स वुईथ प्रमुख स्वामीजी’ या पुस्तकाचे विमोचन करताना सांगितले.
स्वामीनारायणचे प्रमुख स्वामी यांनी शंकराचार्यांसारख्या संतांच्या सहकार्याने हिंदू परंपरा आणखी मजबूत केली आहे. दोन वर्षे प्रचंड त्रास भोगल्यानंतर मी साधू-संतांच्या आशीर्वादाने त्यातून बाहेर पडलो. म्हणूनच जगातील कोणत्याही समस्येवर केवळ हिंदू धर्मातच तोडगा असल्याची खात्री मला पटली, असे अमित शाह म्हणाले.
यावेळी बोलताना कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला म्हणाले की, धर्मदंड हा राजदंडापेक्षाही मोठा आहे. यावेळी त्यांनी राजकोटचे महापौर असताना १९८० मधील घटनेचे उदाहरण दिले. स्थानिक परंपरांना फाटा देऊइन मी प्रमुख स्वामी यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मला महापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रा. स्व. संघाच्या संस्कारामुळेच मी प्रवाहाच्या विरोधात जाऊ शकलो होतो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23141

Posted by on Jun 30 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1594 of 2453 articles)


मुंबई, [२९ जून] - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे एक शिष्टमंडळ आठवडाभराच्या अमेरिका दौर्‍यासाठी सोमवारी सकाळी येथून रवाना झाले. ...

×