Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » हिंदू मुलीला वाचविणार्‍या नाझियाला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

हिंदू मुलीला वाचविणार्‍या नाझियाला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

nazia agraआग्रा, [९ मार्च] – अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हिंदू मुलीची सुटका करणार्‍या १५ वर्षीय नाझिया या मुस्लिम मुलीचा उत्तर प्रदेश सरकारने राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मात्र याचा सर्वाधिक आनंद हिंदू कुटुंबाला झाला आहे. नाझिया येथील साघिर फातिमा महम्मदिया गर्ल्स कॉलेजात शिक्षण घेत असून, एक लाख रुपये रोख व मानपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला.
७ ऑगस्ट २०१५ रोजी घरी परतत असताना फारशी वरदळ नसलेल्या जागी एका लहान मुलीचे ओरडणे नाझियाला ऐकू आले. आवाजाचा अंदाज घेत ती तेथे गेल्यावर, दोन मोटारसायकस्वार एका मुलीला ओढत असल्याचे तिला दिसले. एक क्षणही न दवडता तिने लहान मुलीला अपहरणकर्त्यांच्या हातातून हिसकले आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली. रस्त्याने जाणारे लोक तेथे गोळा होत आहे हे बघितल्यावर मोटारसायकलस्वार पसार झाले. पण अशा कठीण प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून नाझियाने आपल्या साहसाचा परिचय दिला. केवळ सहा वर्षे वय असलेल्या डिंपीला यामुळे जीवदान मिळाले. घटनेनंतर ती डिंपीला शाळेत घेऊन गेली व घडलेला घटनाक्रम मुख्याध्यापकांना विषद केला. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तिला पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने डिंपीच्या कुटुंबीयांना विशेष आनंद झाला असून, तिच्यामुळेच आमच्या मुलीचा जीव वाचल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27153

Posted by on Mar 10 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (721 of 2452 articles)


=विधिमंडळातील अभिभाषणात राज्यपालांचे प्रतिपादन= मुंबई, [९ मार्च] - राज्यातील जनतेच्या न्याय मागण्यांची पूर्तता करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकार ...

×