Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » हिमालय हादरला, पण तिरंगा ताठ मानेने उभा

हिमालय हादरला, पण तिरंगा ताठ मानेने उभा

india_FlagHimalayaकाठमांडू, [२६ एप्रिल] – शनिवारच्या भूकंपात नेपाळ आणि भारतासह अभेद्य असा हिमालय पर्वतही हादरला. हिमालयाच्या कडा कोसळून काही गिर्यारोहकांचा मृत्यूही झाला. पण, या हिमालयावर अभिमानाने आणि डौलाने फडकत असलेला भारतीय तिरंगा मात्र अजूनही ताठ मानेने उभा आहे. ७.९ इतक्या तीव्रतेचा भूकंपही तिरंग्याला झुकवू शकला नाही.
या महाविनाशी भूकंपात हिमालयावरील दोन बेस कॅम्पवर हिमकडा कोसळल्या आणि त्याखाली दबून अनेक गिर्यारोहकांना आपले प्राण गमवावे लागले. या भूकंपाच्या एक दिवस आधी काही भारतीय गिर्यारोहकांनी हिमालय पर्वत सर करून तिथे तिरंगा फडकावला होता. दुसर्‍या दिवशी झालेल्या भूकंपात हिमालय हादरला असला, तरी तिरंग्यावर या भूकंपाचा कोणताही परिणाम झाला नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22293

Posted by on Apr 27 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1749 of 2453 articles)


हजारावर बळी, असंख्य जखमी ७.९ इतकी तीव्रता आणिबाणी जाहीर= काठमांडू, [२५ एप्रिल] - रिश्टर स्केलवर ७.९ इतकी तीव्रता असलेल्या ...

×